Breaking

Iran vs Israel Conflict : इस्रायलला इराणचे हल्ल्याने प्रत्युत्तर, संघर्षात आतापर्यंत काय घडले महत्वाचे 10 मुद्दे!

Israel blows up Iran’s nuclear facility, killing army chief and two nuclear scientists : इस्रायलने उडवले इराणचे अणुकेंद्र, लष्कर प्रमुखांसह दोन अणुशास्त्रज्ञ ठार

New Delhi: इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लॉयन’ सुरू केले आहे. यात इराणवर मोठा बॉम्ब वर्षाव सुरू आहे. इस्रायलच्या विमानांनी इराणच्या100 ठिकाणांना लक्ष केले. यात इराणचे तीन प्रमुख अनु केंद्र उध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच
गेल्या 45 वर्षा तील या सर्वात मोठा हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख यांच्यासह दोन प्रमुख अनुशास्त्रज्ञ ठार झाल्याचे समोर येत आहे. 10 मुख्य मुद्द्यातून जाणून घेऊ या दोन देशातील संघर्ष नेमका कसा सुरू आहे.

इराणवरील इस्रायलच्या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अजून बरेच काही घडायचे आहे असा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, ‘हे प्रेक्षणीय आहे. आम्ही त्यांना म्हणजे इराण ला संधी दिली, पण त्यांनी ती घेतली नाही. आता त्यांना मोठा धक्का बसला आहे आणि अजून बरेच काही व्हायचे आहे.

Nagpur riots : दंगलीत गाडीचे नुकसान झाले, अजूनही पैसे मिळाले नाहीत

 

शुक्रवारी इस्रायलने इराणच्या अनेक आण्विक ठिकाणांवर हल्ला करून पश्चिम आशियातील संघर्षाची आघाडी उघडली. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर देत इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर इस्रायलमध्येही नुकसान झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
इराणने पहाटे इस्रायलच्या दोन प्रमुख शहर तेल अवीव आणि जेरुसलेमवर हल्ला केला, त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले, त्यानंतर लोक सुरक्षिततेसाठी बंकरमध्ये लपले.

इस्रायली लष्कराने सांगितले की, इराणकडून डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली. मात्र, इराणच्या हल्ल्यात किती लोकांना आपला जीव गमवावा लागला हे इस्रायली लष्कराने अद्याप सांगितलेले नाही. इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी ज्या प्रकारे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, त्यावरून इस्रायलचेही नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Local Body Elections : दिलीप सानंदा राष्ट्रवादीत; समर्थक भाजपमध्ये!

इराणच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून अनेक घरांचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायली मीडियाचे म्हणणे आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.चीनने इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला. इस्रायलने इराणचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले आहे, असे संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत फू काँग यांनी म्हटले आहे. चीनने इस्रायलला हा हल्ला त्वरित थांबवण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इस्रायल आणि इराणला संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले की, इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला, त्यानंतर इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ले केले. आता पुरे झाले. हे थांबवण्याची वेळ आली आहे. शांतता आणि मुत्सद्देगिरीने चर्चा व्हायला हवी.
इस्रायलने इराणच्या सहा अणु तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. अनेक अणुशास्त्रज्ञ आणि सुमारे 20 लष्करी कमांडरही मारले गेले आहेत.

Nago Ganar : शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी फक्त नागपूरसाठी का?

 

इराणनेही प्रत्युत्तर दिले आणि शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायली शहरांवर हल्ले केले. त्यांनी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयालाही लक्ष्य केल्याचा इराणचा दावा आहे.
इस्रायलने इराणविरुद्धच्या कारवाईला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. इराणने त्याला ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ असे नाव दिले आहे. इराणचा इस्रायलवरील हल्ला रोखण्यासाठी अमेरिकेनेही मदत केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि नौदलाच्या विनाशकांनी इस्रायलला मदत केली, ज्यामुळे बहुतेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हवेत नष्ट झाली.