व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Prataprao Jadhav : एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हायलाच हवे; केंद्रीय राज्यमंत्र्याने घेतली भूमिका

Prataprao Jadhav : एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हायलाच हवे; केंद्रीय राज्यमंत्र्याने घेतली भूमिका

Sub-categorisation of SC Reservation Must Be Implemented, Says Union Minister of State Prataprao Jadhav : मातंग समाजाच्या मागणीला बळ; आरक्षण उपवर्गीकरणाला प्रतापराव जाधवांचा पाठिंबा

Mehkar अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील अनेक जाती विखुरलेल्या व असंघटित असल्याने त्यांना आरक्षणाचे अपेक्षित लाभ मिळत नाहीत. विशेषतः मातंग समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्याने त्यांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीला न्याय मिळाला पाहिजे. एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

सकल मातंग समाजाच्या वतीने विजय अंभोरे, साहेबराव पाटोळे आणि शांताराम तायडे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मात्र, आपण सन २००० मध्ये आमदार असतानाच एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे, ही भूमिका मांडली होती. समाजातील सर्व घटकांना आरक्षणाचा समतोल लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Farmers loan waiver : सरसकट कर्जमुक्तीसाठी उध्दव सेनेचे ‘डफडे बजाव’; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

यावेळी समाधान साठे, गजानन पवार, बी. के. खरात, ज्ञानदेव मानवतकर, विलास मानवतकर, शालिकराम मानकर, सुनील दुतोंडे, सोपान पाटील, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, स्थानिक चनखोरे कॉलनी येथे शांताराम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात जिल्हास्तरीय सकल मातंग समाज मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन सादर केले. यावेळी भास्कर अगम, ओमप्रकाश नाटेकर, मदन रत्नपारखी, दत्तात्रय बोरकर, प्रभाकर आवारे, दिगंबर पाटोळे, प्रदीप साळवे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!