Amravati Divisional Joint Director of Agriculture accused of irregularities : आमदार सुरेश धस यांची प्रधान सचिवांकडे तक्रार, चौकशीसह बडतर्फीची मागणी
Amravati विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) प्रमोद लहाळे यांनी यांनी यापूर्वी पदाचा दुरुपयोग करून अनेक निकटस्थांना शासन सेवेचा लाभ दिलेला आहे. शिवाय अनेक प्रकरणांत अनियमितता केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे केला. याबाबतची तक्रार राज्याचे प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे केली. त्यामुळे सेवानिवृत्तीला दोन महिने बाकी असताना लहाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लहाळे बुलढाणा एसडीओ (कृषी) असताना वर्ग ४ ची पदे भरण्यासाठी असलेल्या परीक्षेत अनियमितता झाल्याने दोषारोपण करण्यात आले. १२ जुलै २०१६ पासून विभागीय चौकशी सुरू झाली. तोवर एसएओ पदोन्नती पदरात पाडून घेतली. परीक्षा रद्द झाली असली तरी प्रश्नपत्रिका फोडण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा लहाळे यांनी केला. त्यामुळे २५,९४८ रुपये वसूलपात्र करण्यात आल्याने ते दोषी सिद्ध होत असल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे. यापूर्वी १६ मे रोजी आ. धस यांनी केलेल्या तक्रारीवर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी लहाळे यांना नोटीस बजावल्याची माहिती आहे.
Mahavitaran : वीज वितरण केंद्र पेटवण्याचा प्रयत्न, दोघांना अटक!
लहाळे यांनी निवडणूक आयुक्तांचे आदेश डावलून २३ सप्टेंबर २०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यात सुनील राऊत, बबन उके, श्रीकांत सोनेकर यांच्या नियमबाह्य बदल्या केल्या व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे.
लहाळे यांच्यावर धस यांचा प्रहार
एसएओ अकोला येथील वर्ग ४ च्या भरती प्रक्रियेत लहाळे यांनी त्यांचा भाचा शिवा फाटे याला भरती करून पुढे वाहनचालक पदावर नेमले. सख्खा भाऊ विनोद लहाळे याला वर्ग ४ मध्ये नेमणूक देऊन त्याला काही दिवसांनी कृषी सहायक पदावर पदोन्नती दिली.
लाचलुचपत प्रकरणात १६ जुलै २०२४ रोजी निलंबित जेडीए कार्यालयातील वरिष्ठ लिपिक दिलीप वंजारे यांच्याकडून रक्कम घेऊन तत्काळ पदस्थापना दिली. लहाळे जेडीए अमरावती पदावर नियुक्त झाल्यावर हा कारनामा केल्याचा आरोप तक्रारीत आहे.