Breaking

MLA Manoj Kayande : रस्ते खोदल्यामुळे नागरिकांचे हाल; प्रशासनाचा ताल

Citizens express their dissatisfaction with the municipality during the review meeting : आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस; पालिकेकडे मनुष्यबळच नाही

Sindkhed raja शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिःसारण योजना सुरु असतानाच त्यासंबंधीत समस्यांवर नागरिक व पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला. या असंतोषाचा राजकीय वाद चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार मनोज कायंदे यांनी नगरपालिकेत आढावा बैठक घेतला.

मलनिःसारण योजना सुरु होण्याआधीच शहरातील ५१ किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले होते. आता ही ३० कोटी रुपयांची योजना अंतिम टप्प्यात असून त्याद्वारा दररोज प्रती व्यक्ति १३५ लिटर पाणी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, या कामाचा ७० टक्के भाग अपूर्ण असतानाच ६० कोटी रुपयांच्या मलनिःसारण प्रकल्पासदेखील सुरुवात करण्यात आली. त्यामुळे परत एकदा रस्ते खोदण्यात आले आहेत.

त्यासोबतच पावसाचा तडाखा सुद्धा बसला आहे. या सर्वांमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. बैठकीला माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, ॲड. नाझेर काझी, विष्णू मेहेत्रे, निवृत्त शिक्षणाधिकारी मंजाजी चौधरी, मुख्याधिकारी आशिष बोबडे, पालिकेचे विभाग प्रमुख व नागरिक उपस्थित होते.

Buldhana Police : दारुबंदीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

विकासकामे सुरु असतानाच त्यामुळे नागरिक त्रस्त आहेतच. शिवाय पालिकेचे असमाधानकारक मनुष्यबळ व वाढलेल्या अतिक्रमणांमुळे शहरातील स्थिती अधिकच वाईट झाली आहे. त्याविरोधातही असंतोष उफाळून आला. ‘शहरातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामावर बारीक नजर ठेवावी, असे निर्देश आमदारांनी दिले.

Sudhir Mungantiwar : 66 वर्षांच्या तुलनेत 11 वर्षांत 5 पट अर्थसंकल्पीय वाढ

या आढावा बैठकीत माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांनी आपल्यातीलच काही राजकारणी या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप केला. या सूचनेला सभेत असलेल्या अनेकांनी टाळ्या वाजवल्या असल्या तरी त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांनीदेखील या चर्चेत आपले मत मांडले, त्यामुळे स्थानिक राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.