Supriya Sule’s WhatsApp status is hotly debated: सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा
mumbai : चॅट जीपीटी ला विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातवॉशिंग्टन, डी.सी. हे अमेरिकेचे राष्ट्रीय राजकीय केंद्र आहे.तर बारामती हे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एक प्रभावी ठिकाण मानले जाते. असे उत्तर आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी ठेवलेले हेच स्टेटस सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
देशाच्याही राजकारणात खा. शरद पवार यांना महत्त्व आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचे वजन कायम आहे. संरक्षण, कृषी, सहकार, नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील समस्यांवर तोडगा काढायचा असतो तेव्हा शरद पवार यांचा सल्ला घेतला जातो. आज त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवले आहे. जे चर्चेचा विषय बनले. सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या स्टेटसमध्ये जगातील आणि महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू काय आहे? याविषयी माहिती देण्यात आली. एका मुद्द्यात जागतिक पातळीवरील राजकीय केंद्रबिंदू तर दुसऱ्या मुद्द्यात महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदू याविषयी माहिती देण्यात आलीय.
Supriya Sule On Ajit Pawar : दादासोबत जाण्यास ताई तयार! सुप्रिया सुळेंचे संकेत
वॉशिंग्टन, डी.सी. हे अमेरिकेचे राष्ट्रीय राजकीय केंद्र आहे. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाइट हाऊस, संसद म्हणजे काँग्रेस आणि सर्वोच्च न्यायालय येथेच आहे. संपूर्ण देशाचे धोरण व कायदे याच ठिकाणी तयार होतात. तर बारामती हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी ठिकाण मानले जाते. शरद पवार, ज्यांना ‘राजकारणातील शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते, त्यांचा बारामतीशी खोल संबंध आहे. सध्या त्यांची कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत, असं सुप्रिया यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हणण्यात आलंय.
Nana patole : हिंदी सक्तीच्या वादामागे फडणवीस, राज ठाकरे यांची मिलीभगत!
जगाच्या राजकारणात अमेरिकेला फार महत्त्व आहे. अमेरिकेने घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा परिमाण संपूर्ण जगावर होतो. अमेरिकेने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर जगभरातील नागरिकांना त्याची झळ बसते. त्यामुळेच जागतिक राजकारणात अमेरिका हा महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या भूमिका आणि विचाराला राजकारणात वेगळे महत्त्व आहे. हेच सुप्रिया सुळे यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यांचे स्टेटस हा चर्चेचा विषय ठरला.








