ASHA workers have not received their honorarium for six months : आशा वर्कर्सचे मानधन थकवले, ९ जुलैला जिल्हा आरोग्य कार्यालयावर मोर्चा!
Buldhana राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे मानधन गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो आशा वर्कर्स आणि त्यांचे कुटुंबीय उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर सीआयटीयूच्या नेतृत्वाखालील संघटनेने राज्य सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. ९ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येणार आहे.
आरोग्य योजनांची अंमलबजावणी, घराघरात लसीकरण, गरोदर माता, बालके, ग्रामीण आरोग्य सेवा—या सगळ्या जबाबदाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिला कमी मानधनावर, कोणतेही सुरक्षा कवच न घेता पूर्ण करतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून याच महिलांचे मानधन थकवले गेले आहे.
Shivsena confict : एक म्हणतो ‘ कम ऑन किल मी’; दुसरा म्हणतो ‘तुला आता कशाला मारायचे?’
१७ जून रोजी देशाचे आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा दौऱ्यावर असताना, सीआयटीयू जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात थेट भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी विजया ठाकरे, रेखा इंगळे, अर्चना मोरे, संगीता मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
राज्यमंत्री जाधव यांनी बैठकीत स्पष्ट सांगितले की, केंद्र सरकारने एनएचएम अंतर्गत निधी पाठवलेला असतानाही राज्य आरोग्य विभागाने तो अन्य कारणांसाठी वापरला, आणि विनियोग प्रमाणपत्र केंद्राला न दिल्याने पुढील निधी अडकला. परिणामी, जानेवारी २०२५ पासून आशा व गटप्रवर्तकांना मानधन मिळालेले नाही.
Eknath Shinde Shiv Sena : मुंबईतील माजी नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, शिंदें गटात प्रवेश
जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले की, “हे सरकारचे ठरवून दुर्लक्ष आहे. आम्ही याचा तीव्र विरोध करणार आहोत. जर तातडीने मानधन अदा झाले नाही, तर संपूर्ण जिल्हाभर कामबंद आंदोलन छेडले जाईल.”