Citizens of 426 slums in Nagpur get their own house : मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; श्रमीकनगर झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टे देण्याचा निर्णय
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर मिळाले आहे. अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न केले होते. त्यांनी भाडेपट्टे देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो नागरिकांना हक्काचे घर मिळाले आहे.
संबंधित ४२६ झोपडपट्टींमधील लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टीने आता जुन्या पाऊलखुणा पुसत श्रमीकनगर म्हणून आपल्या झोपडपट्टीचे नामकरण केले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून झोपडपट्टीमधील जे अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या प्रवर्गात आहेत त्यांना रमाई आवास योजनेत, याचबरोबर आदिवासी प्रवर्गात असलेल्या व्यक्तींना शबरी आवास योजनेत व इतर प्रवर्गातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली आहेत.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याची ऐशीतैशी!
फडणवीस हे नगरसेवक असल्यापासूनच यासाठी आग्रही होते. त्यांनी लकी हक्काच्या पट्ट्यासाठी एनआयटीवर मोर्चा काढला होता. लक्ष्मीनगरचे वार्डाचे नगरसेवक या नात्याने त्यांनी झोपडपट्टीतील प्रश्नांबाबत वारंवार आवाज उठविला. पुढे महापौर झाल्यानंतर या झोपडपट्टीसाठी सुविधेला त्यांनी प्राधान्य दिले. या झोपडपट्टीवर शाळेसाठी आरक्षण होते. ते उठविण्यासाठी १९९९ नंतर या भागाचे आमदार या नात्याने एनआयटीकडे पाठपुरावा केला.
Shivbhojan Thali : गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले!
प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांनी एनआयटीवर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले अशी आठवण शहर विकास आघाडीचे अनिलवासनिक यांनी करुन दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर व ग्रामीण भागातील गरीब लोकांना पट्टे वाटपासह इतर दिलेल्या योजना लाखमोलाच्या ठरल्या. अनेक भागात नागरी सुविधा पोहचल्या. लक्ष्मीनगर येथे नवबौद्ध व इतर समाजाची संख्या अधिक आहे. सर्वांच्या मताचा आदर करुन या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्ही लोकवर्गणीतून उभा केला. लोकवर्गणीतून या पुतळ्यावर छोट्या छत्रीचे कामही झाले हे विशेष.