Will continue as the chairman of the district bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम; विरोधकांना दणका
Amravati प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केला आहे. त्यामुळे त्यांचे अध्यक्षपद कायम आहेत. त्यांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना कडू म्हणाले, “ही सत्याच्या विजयाची नोंद आहे. न्यायदेवतेने न्याय केला. काही काँग्रेस नेते भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करत आहेत. त्यांनी भाजपच्या मदतीने आम्हाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी, कामगार, मजूर व दिव्यांग यांच्या आशीर्वादाने हे प्रयत्न निष्फळ ठरले.”
Praful Gudadhe : मुख्यमंत्र्यांनीच दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केला
२०१७ मध्ये नाशिक येथे आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांना न्यायालयाकडून एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सहकारी बँकेच्या नियमांनुसार, संचालकाला एक वर्षाची शिक्षा झाल्यास तो पदावर राहू शकत नाही. याच आधारावर हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बारा संचालकांनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी त्यांना नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर कडूंना पुढील पाच वर्षे बँकेच्या निवडणुकांपासून अपात्र ठरविण्यात आले. मात्र त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयाने सहनिबंधकांचा आदेश स्थगित केला.
Collector of Nagpur : गावांतील छोट्या-मोठ्या तक्रारींवर शोधले ‘समाधान’!
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित केल्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रकरणात काय निकाल लागतो, याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण आता या निकालाना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.