Congress leader accuses government on Molestation case : भाजप पदाधिकारीच महिला पोलिसांचा विनयभंग करत असतील तर न्याय मिळेल का?
Nagpur : पुणे येथील शहर भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिस निरीक्षकाला नको तेथे स्पर्श करून विनयभंग केला, असा आरोप करण्यात आला आहे. या महिला पोलिस निरीक्षकाने प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कोंढरे यांनी राजीनामा दिला. या प्रकरणानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांचा पुणे येथे नियोजित दौरा होता. आयोजित कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी सदर महिला पोलिस अधिकारी शनिवार वाडा परिसरात बंदोबस्तावर तैनात होत्या. येथेच भाजपचे आमदार हेमंत रासने, भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. गडकरींना येण्यासाठी अवकाश असल्याने आमदार हेमंत रासने हे आपल्या कार्यकर्त्यांना आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तेथीलच एका ठिकाणी चहा पिण्यासाठी घेऊन गेले. दरम्यान प्रमोद कोंढरे याने गर्दीचा फायदा घेत महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याचा आरोप केला गेला आहे.
यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना धक्कादायक आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना जर महिला पोलिस देखील सुरक्षित नसतील तर याहून मोठे दुर्दैव काय असेल? मुख्यमंत्री, गृहमंत्री भाजपचे आहेत आणि भाजप पदाधिकारी महिला पोलिसाचा विनयभंग करत असतील तर महिलांना न्याय मिळेल का?
Election voting : वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली;
महिला पोलिसांवर ही वेळ असेल तर राज्यातील लाडक्या बहिणींना वाचवा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे का, हा प्रश्न आज उपस्थित होत आहे.’