Breaking

PWD Buldhana : चिखलीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह रातोरात पाडले!

British-era rest house in Chikhali demolished overnight : मंजूर निधी असूनही PWD चा कारनामा; १९३७ चे होते बांधकाम

Buldhana चिखली शहरातील १९३७ मध्ये बांधलेले ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता रातोरात जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या इमारतीच्या मजबुतीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी ८० लाख रुपये निधी मंजूर केला होता.

सदर इमारत मजबूत असूनही PWDने ती जीर्णावस्थेतील असल्याचे कारण देत स्वतःच पाडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यासाठी ना कोणती पूर्वपरवानगी घेण्यात आली, ना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे या पाडकामामागे आर्थिक अनियमितता व गुप्त हेतू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Local Body Elections : प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा हस्तक्षेप

स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला विश्रामगृहाच्या मजबुतीकरणासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. करारात स्पष्टपणे ‘मजबुतीकरण’ असा उल्लेख असून, पाडकामाचा कुठेही उल्लेख नाही. ६६ लाख १६ हजार रुपयांच्या कामासाठी ही निविदा मंजूर करण्यात आली होती.

पाडलेली इमारत ऐतिहासिक असतानाही, त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती मिळते. ही बाब केवळ निधीचा अपव्यय नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला दुजोरा न देण्याचा गंभीर प्रकार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Bacchu Kadu : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सत्ताधाऱ्यांशी छुपी युती

ही कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. शासनाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या धोरणाला अशी पावले मोडीत काढत असल्याने भविष्यातील घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.