Credit politics between BJP-Congress : श्री राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ तीर्थक्षेत्र दर्जा, निधीचा मार्ग मोकळा
Akola अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराला महाराष्ट्र शासनाकडून अखेर ‘ब’ दर्जाचा तीर्थक्षेत्राचा मान मिळाला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्यासोबतच हा दर्जा मिळवण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय वाटण्याची स्पर्धा लागली आहे.
या निर्णयासाठी पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या कक्षात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मनपा आयुक्त सुनील लहाने व जिल्हा नियोजन अधिकारी सोनखासकर यांनी सहभाग घेतला. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना आमदार पठाण यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !
दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी सायंकाळी श्री राजराजेश्वर मंदिरात जल्लोष करण्यात आला. आमदार वसंतजी खंडेलवाल यांनी मंदिरात जलाभिषेक करून राज्य शासनाचे तसेच माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या वेळी ढोलताशांच्या गजरात पेढे वाटप करण्यात आले.
भक्तांच्या मागणीला प्रतिसाद गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांकडून मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत होती. हा दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसराचा विकास वेगाने होणार असून, जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या निधीचा पहिला टप्पा मिळण्याची शक्यता आहे.
Akash Fundkar : बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना बसणार दणका
एकात्मिक सहभाग या उपक्रमात काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला. एका बाजूला आमदार पठाण यांच्या पाठपुराव्याला यश आले, तर दुसरीकडे आमदार खंडेलवाल व माजी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांचाही उल्लेख करण्यात आला. या निर्णयामुळे अकोल्याच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला नवा चालना मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.