Breaking

Kirit Somaiya : ३०० हून अधिक जन्मदाखले बेकायदेशीर; सोमय्यांचा मोर्चा बुलढाण्याकडे

 

More than 300 birth certificates alleged to be illegal : नायब तहसीलदारांच्या आदेशाने प्रमाणपत्र जारी झाल्याचा आरोप

Buldhana“बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांच्या आदेशाने ३०० पेक्षा जास्त बेकायदेशीर प्रमाणपत्रे जारी करण्यात आली असून, ही गंभीर बाब आहे. हे सर्व आदेश मंत्रालयाच्या सूचनेनंतरही अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत,” असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

बुलडाणा दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणात चर्चा केली. सोमय्यांनी सांगितले की, “या संदर्भात मंत्रालयाने सर्व बेकायदेशीर प्रमाणपत्रे रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते, मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हा प्रकार प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.”

Conflict on Hindi language compulsion : हिंदी सक्तीला विरोध! मराठी माणसांचा 6 जुलैला भव्य मोर्चा

त्यांनी यावेळी यापूर्वी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बुलडाणा जिल्ह्यात जन्मप्रमाणपत्रे मिळवल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. “या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य आदेश देण्यात आले. केवळ बुलडाण्यातच नव्हे, तर मलकापूरमध्ये तब्बल १४२६ बेकायदेशीर जन्मनोंदी सरकारी दवाखान्यांत आढळल्या आहेत,” असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar : ‘त्या’ सर्व अफवाच..! वनजमिनीवरील घरांबाबतचा संभ्रम मुनगंटीवारांनी संपवला !

भाजप नेत्यांनी या प्रकरणात थेट कारवाईसाठी आता पुढाकार घेतल्याने जिल्हा प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा भाजपने आक्रमकपणे पुढे नेण्याचे संकेत या दौऱ्याच्या माध्यमातून दिले आहेत.

सोमय्यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केला जाईल व सर्व बेकायदेशीर नोंदी रद्द करण्यासाठी प्रशासनाला बाध्य केले जाईल. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.”