Breaking

Heavy rains in Buldhana : डोणगावमध्ये पाच शेतकरी पुरात अडकले; बचावकार्य प्रगतीपथावर

Five farmers trapped in flood in Dongaon : शेतीच्या कामासाठी नदीपात्र ओलांडले; परतीचा मार्ग बंद

Buldhana मेहकर व लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शेतजमिनीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच डोणगाव येथून एक गंभीर घटना समोर आली असून, पाच शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना शेलगाव देशमुख रोडवरील कास नदीपात्रात घडली आहे. गोविंद परमाळे, आकाश परमाळे, कुलदीप परमाळे, अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कन्हाळे अशी पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. ते सर्वजण डोणगाव येथील रहिवासी आहेत. सकाळी शेतीकामासाठी नदीपात्राच्या पलीकडे गेले असताना अचानक आलेल्या पुरामुळे परतीचा मार्ग बंद झाला.

Devendra fadnavis : लोणीकर तुम्ही चुकलेच, मुजोर वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी फटकारले!

सध्या पाचही शेतकरी नदीपात्रातील निंबाच्या झाडावर चढून आश्रय घेतलेला असून, त्यांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बुलढाणा येथून विशेष बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Kirit Somaiya : ३०० हून अधिक जन्मदाखले बेकायदेशीर; सोमय्यांचा मोर्चा बुलढाण्याकडे

अत्यंत धोकादायक वळणावर असलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाची संततधार अद्याप सुरूच असल्याने पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बचावकार्य जलद आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.