Brutal Murder of female kirtankar: डोक्यात घातला दगड, चोरी की इतर काही कारण शोध सुरू
Vaijapur: एका कीर्तनकार महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या चिंचवड येथे उघडकीस आली आहे. हभप संगीताताई महाराज या नावाने
प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार महिलेला, अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड मारून संपवले हा प्रकार सकाळी निदर्शनास आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली की दुसरे काही कारण होते याचा पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडगाव येथील 50 वर्षीय संगीताताई अण्णासाहेब पवार या हत्येत बळी पडल्या. प्राथमिक माहितीनुसार त्या सद्गुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने वार केले. आश्रमात असलेल्या मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी गेले. तेव्हा त्यांनी संगीताताईंना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन त्यांनी पाहिले, यावेळी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. चौधरी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
Shefali Jariwala : ‘ काटा लगा’ फेम शेफाली जरीवालाच्या मृत्यूने बॉलीवूड हादरलं
घटने संदर्भात संगीता ताईंचे भाऊ कृष्णा पवार म्हणाले की त्या कथेसाठी 2009 आणि 2010 मधे वृंदावन येथे राहिलेल्या आहेत. तेथे त्यांनी भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या येथे आल्या. त्यानंतर त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. सहा महिन्यापूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, मी घरी येणार नाही. आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी जागा घेतलेली होती. त्या दोन महिन्यांपासून येथे स्थायिक झाल्या होत्या. मी सकाळी शेतामध्ये असताना मला फोन आला की, इथे काहीतरी घडले आहे. तिथे येऊन बघितलं तर मला ताईची हत्या झाल्याचे समजले
Supriya Sule : फडणवीस माझ्यापेक्षाही अनुभवी, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
संगीताताई या झोपलेल्या असताना कोणीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. यावेळी समोरच्या मंदिरातील कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या परिसरात कीर्तन करायचा. घटनेनंतर त्यांचा मोबाईलही गायब आहे. तसेच मारेकऱ्यांनी सीसीटीव्ही आणि इतर गोष्टींची तोडफोड केल्याचेही सांगितले जात आहे. ही घटना नेमकी चोरीच्या उद्देशाने झाली की, यामागे दुसरे काही कारण आहे याचा तपास पोलीस सर्व अँगलने करत आहेत.
___