Pratap Sarnaik said that every MLA’s one term can be extended : सभागृहातील अभ्यासपूर्ण आणि सुसंस्कृत दृष्टीकोन सातत्याने प्रेरणा देतो
Mumbai : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणजे विकास कामांचा ध्यास घेतलेला एक स्वयंभू नेता. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्यांची काळजी वाहणारे मुनगंटीवार गेल्या २० वर्षांपासून मला प्रेरीत करत आले आहेत. या सभागृहात कार्य करत असताना त्यांच्या भाषणातून प्रत्येक वेळी काही ना काही शिकायला मिळाले आहे, या शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केला.
मोटार वाहन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयकावर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडलेली विधेयके, केलेल्या चर्चा, उपस्थित केलेले प्रश्न, त्यांचा अभ्यासपूर्ण आणि सुसंस्कृत दृष्टीकोन हे मला सातत्याने प्रेरणा देत आले आहे. मोटार वाहन विधेयक सादर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. परिवहन मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेळोवेळी सुधीर भाऊंना सांगत आलो आहे की, त्यांच्या अनुभवाचे आणि मार्गदर्शनाचे योगदान आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे.
कोणत्याही आमदाराने सुधीर भाऊंच्या भाषणांकडे आणि कार्यपद्धतीकडे लक्ष दिले तरी त्या आमदाराची किमान एक टर्म तरी निश्चितपणे वाढू शकते. ही केवळ माझी भावना नाही, तर गेल्या दोन दशकांत अनुभवलेली वस्तुस्थिती आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
Public Security Bill : जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार !
काय आहे विधेयक?
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या घटनांनी एक गंभीर स्वरूप धारण केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या पृष्ठभूमीवर अपघातांची मूळ कारणे ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विधानसभेत काल (११ जुलै) मोटार वाहन (महाराष्ट्र सुधारणा विधेयक – २०२५ (अशासकीय) सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. यावर मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक आणि आश्वासक भूमिका घेत सकारात्मक उत्तर दिले. या संवेदनशील विषयावरील त्यांची तत्परता आणि गांभीर्य लक्षात घेता, मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो व अभिनंदन करतो, असे म्हणत राज्य शासनाने या विधेयकातील सुचनांचा सकारात्मक विचार करून अपघातमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावले उचलावी, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.








