177 lost mobile phones found : बुलढाणा पोलिसांची कामगिरी; ३० लाख रुपयांचे मोबाईल मूळ मालकांकडे सोपवले
Buldhana एकदा हरवलेली वस्तू सापडणे ही खरे तर दुर्मिळच मानले जाते. त्यातही मोबाईल हरवला तर विसराच. पण बुलढाणा पोलिसांनी भलतीच जबरदस्त कामगिरी केली आहे. एक, दोन नाही तर हरवलेले तब्बल १७७ मोबाईल शोधून काढले आणि ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. या घटनेने अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवत तब्बल १७७ हरवलेले अँड्रॉइड मोबाईल शोधून काढले. त्यांची एकूण किंमत सुमारे ३०,०९,०००/- रुपये इतकी आहे. हे सर्व मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
Public Safety bill : काँग्रेसचे नेते म्हणतात, जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकूमशाहीचा पोशाख
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून ही योजना आखण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक खामगाव डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन स्तरावरून सतत पाठपुरावा करत हरवलेले मोबाईल ट्रेस करून ते हस्तगत करण्यात आले. या मोबाईलचा वाटप समारंभ २१ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला. रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मूळ मालकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
हरवलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी नागरिकांनी खालील सूचना पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. याच कार्यक्रमात पोलीस कुटुंबीयांसाठी “महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना” पुस्तिका रामनाथ पोकळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. ही पुस्तिका जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली. यामध्ये अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.
Election Commission : कामं करायला माणसच नाहीत, निवडणुका घ्यायच्या कश्या?
या योजनांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, सबसिडी कॅन्टीन, पोलीस पब्लिक स्कूल, अपघात विमा योजना, वैद्यकीय तपासणी व इतर विविध सवलतींचा समावेश आहे. ही माहिती पोलीस कुटुंबीयांना उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.








