व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Cyber Crime : काय सांगता? ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्ट ?

Cyber Crime : काय सांगता? ज्येष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्ट ?

Money stolen by digital arrest : २८ लाख ३० हजार उकळलेच बुलढाणा जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण

Buldhana डिजीटल अरेस्टचे प्रकरण देशभरात गाजत आहे. असे असताना बुलढाणा जिल्ह्यातील एका वृद्धाकडून एका ठगाने तब्बल २८ लाख ३० हजार रुपये उकळले. विशेष म्हणजे या वृद्धाला तब्बल १५ दिवस डिजिटल अरेस्ट केले हाेते. या प्रकरणी सायबर पाेलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Siddharth Kharat : माझ्या डोक्यात आमदारकी येईना आणि त्यांच्या डोक्यातली जाईना

एक ज्येष्ठ नागरिक बुलढाणा परिसरात हातातील थैलीत शेतीची कागदपत्रे घेऊन फिरत होते. तातडीने शेती विकायची किंवा त्यावर कर्ज घ्यावयाचे असल्याचे ते त्याच्या मित्रांना सांगत होते. गयावया करत होते. दरम्यान, पाणावलेल्या डोळ्यांनी आर्तपणे ते शेती विकण्यासाठी मदत करा, असे मित्रांना विणवत होते. त्यामुळे प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांच्या एका मित्राला आला.

त्यांनी पीडित ज्येष्ठ नागरिकाला थेट बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात नेले. तेव्हा आपण डिजिटल अरेस्ट असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडे जास्त वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले. मला लगेच त्यांना रिपोर्ट करावा लागले, असेही म्हणाले. तेव्हा पोलिसांना हा प्रकार कळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करत त्यांना विश्वास व धीर दिला.

Employees forget office hours : ‘रायगडाला जाग येते… तेव्हा कामकाजाला सुरुवात होते’

त्यांना २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी व्हिडीओ कॉल आला. समोर पोलिस गणवेशातील व्यक्ती होती. तुमचा फोन नंबर संदिग्ध आहे. मनी लाँड्रिंग व पोर्नोग्राफी संबंधाने तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्या कॉल करणाऱ्याने सांगितले. तुम्हाला घरी येऊन अटक करायची की डिजिटल अरेस्टसाठी तुम्ही तयार आहात, अशी विचारणा केली. तेव्हा वृद्धाने डिजिटल अरेस्टसाठी होकार दर्शवला.

त्यानंतर त्यांना सतत व्हिडीओ कॉल सुरू ठेवण्यास सांगितले. डाटा संपत आला तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी वृद्धास ३० जीबीचे रिचार्ज करण्यास सांगितले. रिचार्ज करून येताच रिपोर्ट करायचा. कुणालाही याबाबत सांगायचे नाही. सांगितल्यास थेट कारवाईची धमकीही दिल्या गेली होती. या दरम्यान २८ लाख ३० हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले.

व्हिडीओ कॉलवरच त्यांच्या कागदपत्राच्या तपासणीत शेतीची कागदपत्रे दिसून आली. ती शेती विकून पैसे देण्याची मागणी फसवणूक करणाऱ्याने केली. मुदत दिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

error: Content is protected !!