Bachchu Kadu : सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असते, तर आतापर्यंत कर्जमाफी झाली असती!

If Sudhir Mungantiwar had been the Finance Minister, he would have definitely waived off farmers loans : बच्चू कडू म्हणाले, मुनगंटीवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे

Amravati : सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण सत्ता येताच महायुतीला त्या आश्वासनाचा विसर पडला. यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू तर सरकारवर तुटूनच पडले होते. अशात आज त्यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.

अमरावतीमध्ये आज (२९ जुलै) पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार हे जाणते नेते आहेत. संघाच्या मुशीतून ते वाढले आहेत. गेली ३० – ४० वर्ष ते राजकारण आणि समाजकारणात काम करत आहेत. तळागाळात काम केल्यामुळे त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. आज सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असते, तर त्यांनी केव्हाच कर्जमाफीची घोषणा केली असती. पण त्यांना मंत्रिमंडळातून वगळले, हे तुमचे आमचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला सरप्लस अर्थसंकल्प देणारे मुनगंटीवार हे एकमेव अर्थमंत्री राहिलेले आहेत.’

Hybrid annuity scheme : २०० कोटींच्या रस्त्याच्या गुणवत्तेवर माजी राज्यमंत्र्यांचा सवाल

सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. आठ मंत्र्यांना डच्चू देऊन काही जुन्याजाणत्या नेत्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. अशातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकते, असे संकेत दोन दिवसांपूर्वीच दिले होते. चंद्रपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी हे महत्त्वाचे विधान केले होते. त्यानंतर आज बच्चू कडू यांचे उपरोक्त वक्तव्य म्हणजे शिवेंद्रराजे भोसलेंच्या संकेताला दुजोरा देणारे आहे, असे मानले जात आहे.