Fund allocation : सरकारकडून 65 शहरांसाठी 500 कोटींचे वाटप

Election season in full swing, large scale fund distribution : निवडणूक हंगामाची चाहूल, मोठ्या प्रमाणावर निधी वितरण

Mumbai : राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असून सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असताना महायुती सरकारने विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी वाटपाला सुरुवात केली आहे.

केवळ दोन दिवसांत 65 नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांसाठी तब्बल 500 कोटी रुपये मंजूर करून वितरित करण्यात आले आहेत. नगरविकास विभागाने यासंबंधीचे आदेश जारी केले असून, आणखी काही शहरांना लवकरच निधी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

Sudhir Mungantiwar : ‘आ. सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी’

या निधी वितरणात मुंबई उपनगराला सर्वाधिक 36.62 कोटी रुपयांचा वाटा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा, बहादुरा नगरपंचायतींसाठी 40 कोटी, रत्नागिरीतील खेड, भंडणगड, दापोलीसाठी 19.90 कोटी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगलेसाठी 16.6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नाशिक उद्योग भवनासाठी 16 कोटी आणि इतर कामांसाठी 13.75 कोटी असा एकूण 30.36 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मुरबाडसाठी 16.90 कोटी, सांगली जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी 10.5 कोटी, कर्जत आणि कोपरगावसाठी 2 कोटी, रायगडमधील उरणसाठी 15 कोटी, बुलडाण्यातील देऊळगाव व सिंदखेडसाठी 5 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, पोचुर्णा नगरपंचायतींसाठी 10 कोटी, तर साताऱ्यातील मलकापूरसाठी तब्बल 20.80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश

राज्यातील निवडणूक वारे अधिकच जोर धरू लागले असताना अशा प्रकारची ‘निधी वाटप’ सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांनी याला निवडणुकीपूर्वीचा ‘विकासाचा लोणी लावण्याचा खेळ’ म्हटले असून, सत्ता पक्ष मात्र हा केवळ जनतेच्या हिताचा निर्णय असल्याचा दावा करत आहे.