Girish Mahajan’s statement creates a stir in the Mahayuti : गिरीश महाजनांच्या विधानाने महायुतीत खळबळ
Nashik : राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. एखाद – दुसरी जागा अपवाद असू शकते, पण पहिला पर्याय म्हणजे महायुतीच आहे. मात्र आता भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
Independence Day : ‘सुटी नव्हे उत्सव साजरा करू या’, फुटाळा तलावावर गरजले राष्ट्रप्रेमाचे वादळ !
आम्ही युतीमध्येच लढणार, पण युती झाली तरी नाशिकमध्ये 100 पार, नाही झाली तरी 100 पार, असे महाजन म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. महाजन म्हणाले, मी भाजपात सगळ्यात सिनियर आहे, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलो आहे. मी पण एक साधा कार्यकर्ता होतो.
दरम्यान, महायुतीमधील घटक पक्ष निवडणुका एकत्र लढवण्याचे संकेत देत असताना, महाविकास आघाडीचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आघाडीतील पक्ष या निवडणुका कशा लढवणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
____








