Congress holds candle march in Akola : लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
Akola मतदार यादीतील कथित फेरफार व गैरप्रकारांविरोधात अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी भव्य कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेतून मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला होता. काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदार यादीत फेरफार करून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra politics : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू
या आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोल्यात “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात स्वराज्य भवन येथून सायंकाळी सात वाजता झाली. कार्यकर्त्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निदर्शने करत लोकशाही व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी केली. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
Tiranga Yatra : अकोल्यात भव्य तिरंगा यात्रा; आकाश फुंडकर काँग्रेसवर बरसले
या मोर्चात पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखेडे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, अक्षय राऊत, महेंद्र गवई, पराग कांबळे, फजलू पहेलवान, कपिल रावदेव, मोहम्मद इरफान, मोईन खान, आशिष पांडे, फिरोज गवळी, गणेश कळसकर, दत्ता डिक्कर, सैय्यद शहजाद, पंकज वाढवे, सचिन तिडके, विनोद मराठे, हनिफ भाई, नवेद गवळी, असिफ खान, समीर बरतनवाले, रेहमान बाबू, प्रशांत प्रधान, संदेश वानखेडे, सुनिल वानखेडे, मो. नौशाद, तश्वर पटेल, अब्दुल्ला, वसिम खान, विजय देशमुख, सकावत शहा, अतुल अमानकर, अक्रम भाई आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








