Ward structure announced : बुलढाणा शहरात पालिका निवडणुकीची लगबग
Buldhana जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून नागरिक व राजकीय पक्षांना ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. १ ते ८ सप्टेंबरदरम्यान सुनावणी होणार असून, ३० सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
नगरपरिषदेची शेवटची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्या कार्यकाळाची मुदत ३ जानेवारी २०२१ रोजी संपल्यानंतर नगरपरिषद प्रशासकांच्या ताब्यात गेली होती. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे स्थानिक विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक नागरिकांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाची ठरणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून बुलढाणा नगरपरिषद निवडणूक यामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Jaljeevan Mission : जलजीवन मिशन थकीत देयकांवरून कंत्राटदार आक्रमक
प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे गट सक्रिय झाले आहेत. नागरिकांच्या हरकती आणि सूचना ३१ ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यानंतर सुनावण्या पार पडून ३० सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. या घडामोडींमुळे पालिका निवडणुकीतील सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.
Bad Roads : तिन किलोमीटरसाठी मारावा लागतो १८ किलोमीटरचा फेरा !
या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीत युती होणार की पक्ष स्वतंत्र रिंगणात उतरणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. स्थानिक पातळीवरील नाराजी, कार्यकर्त्यांचे समीकरण आणि मतदारांचा कल हा गायकवाड यांच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारा ठरणार आहे.








