Gutkha mafia : मेहकर पोलिसांची गुटखा माफियावर धडक कारवाई; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mehkar police action; seized valuables worth 77 lakhs : समृद्धी महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक रोखली; कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाची संयुक्त कारवाई

Mehkar महाराष्ट्रात गुटखा बंदीचा कायदा असूनही अवैध गुटखा व्यापार तेजीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र या अवैध धंद्यावर मेहकर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईने गुटखा माफियांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल ₹७७ लाख ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

२१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरून आयशर टेम्पोने शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक होत आहे. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पहाटे ४ वाजता समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र. २८२ जवळ सापळा रचण्यात आला.

संशयित आयशर टेम्पो अडवून तपासणी केली असता गुटख्याने भरलेला असल्याचे स्पष्ट झाले. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना पाचारण करून तपासणी करण्यात आली. त्यात ₹६५ लाख ५२ हजार किमतीचा गुटखा आणि ₹१२ लाख किमतीचे वाहन असा एकूण ₹७७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Protest for loan waiver : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘काळा बैल पोळा’!

या प्रकरणात एक आरोपीला अटक झाली असून, मुख्य सूत्रधार व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ST Employees ; एस.टी. कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी पगार?

या मोहिमेत पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाखाली निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, पोउपनि वसंत पवार, गणेश कड, संदीप मेधने, तसेच पोलिस कर्मचारी आणि अन्न व औषध प्रशासनाची टीम सहभागी झाली.