Ladki Bahin Scheme : जिल्हा परिषदेच्या १९९ महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ ठरल्या अपात्र!

199 women employees of Zilla Parishad disqualified : आता घ्यावा लागणार लाभ परत, शिस्तभंगाची टांगती तलवार; जिल्ह्यातील ५१ हजार लाभार्थी रडारवर

Buldhana विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत तब्बल १,१८२ कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १९९ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही पडताळणी न करता लाभ वितरित करण्यात आला. परिणामी, अनेक अपात्र लाभार्थींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले. आता शासनाने पडताळणी सुरू केली असून, या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेला लाभ परत वसूल केला जाणार आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Prataprao Jadhav, Siddharth Kharat : माजी मंत्र्याचे केंद्रीय मंत्री व आमदाराला खरमरीत पत्र!

जिल्ह्यात एकूण ५१ हजार लाभार्थी महिलांची सध्या पडताळणी सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महिलांचा समावेश आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी याबाबत माहिती दिली.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा! मुंबईच्या व्यापाऱ्याचे ४.६० कोटींचे सोने लुटले

पडताळणीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. निवडणुकीमुळे कोणतीही तपासणी न करता रक्कम जमा करण्यात आल्याने आता प्रशासनाने अपात्र लाभार्थ्यांची शाेधमोहीम सुरू केली आहे.एकाच घरातील केवळ दाेन महिलांना लाभ देण्यात येत असताना तीन लाभार्थी आहेत. तसेच ६५ वर्षांवरील महिलांनीही या याेजनेचा लाभ घेतल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे, या अपात्र बहीणींना लाभ थांबवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ५१ हजार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.