व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Raju Shetty : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

Raju Shetty : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

Provide compensation to farmers affected by excessive rainfall : राजू शेट्टींची मागणी, Serious allegations against the Food Security Act

Chikhali : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. “नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी,” अशी ठाम भूमिका शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना सतत आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. हुमणी अळीच्या कचाट्यातून वाचविलेले पीक आता पुराच्या तडाख्यात सापडले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिके कुजली आणि विहिरी खचल्या. शासन पंचनामे करत आहे, पण मिळणारी नुकसानभरपाई अपुरी आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत केलेली मेहनत लक्षात घेता शासनाने सरसकट मदत द्यावी.”

Akash Fundkar : कामगार कीटच्या मुद्यावरून राजकारण पेटले

त्यांनी पुढे म्हटले की, “शेतकरी शासनाकडे भीक मागत नाही. परंतु शासनाकडून शेतमालाचा भाव असताना पाडला जातो आणि नसताना वाढतो. ही बाब शेतकऱ्यांना भिकेला लावते.”  शेट्टी यांनी यावेळी भावनिक आवाहन करताना स्पष्ट केले की, “पाशा पटेल आणि मी शरद जोशींच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. त्यांनी आता भूमिका बदलली असली तरी मी मात्र शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार.”

Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना

राजू शेट्टी यांनी यावेळी शासनावर अन्न सुरक्षा कायद्याचा (१९५५) दुरुपयोग केल्याचा आरोप केला. “या कायद्याचा आधार घेत शासन नको तितका हस्तक्षेप करत आहे आणि शेतमालाचे भाव पाडत आहे,” असे ते म्हणाले.

error: Content is protected !!