We will fight’, We will win, We will all jarange slogans of One Maratha, one lakh Marathas : ‘लढेंगे’, ‘जितेंगे’, ‘हम सब जरांगे’ ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा
Mumbai : राज्यभरातून उसळलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने सकाळी मुंबईत भक्कम पाऊल टाकले. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचा विशाल ताफा नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर दाखल झाला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘लढेंगे’, ‘जितेंगे’, ‘हम सब जरांगे’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक मुंबईकडे निघाले होते. २८ ऑगस्टच्या दुपारपासूनच हजारो आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. सिडको प्रदर्शन केंद्र, नवी मुंबई बाजार समिती, तेरणा विद्यालय, तसेच मिळेल त्या ठिकाणी आंदोलकांनी मुक्काम केला होता. रात्री उशिरा चाकणवरून मनोज जरांगे यांचा ताफा निघाला आणि प्रत्येक टप्यावर सकल मराठा समाजाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Amol Mitkari : फडणवीसांनी देशाचं, तर अजित पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं
आज सकाळी वाशी टोल नाक्यावर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक पोहोचले. वाशी टोल नाका ते वाशी प्लाझापर्यंत आंदोलकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली. रस्त्याच्या कडेला उभे असलेले मराठा बांधव घोषणांनी ताफ्याचे स्वागत करत होते. वाशी टोल नाका परिसरात घोषणांचा गजर सुरू होताच संपूर्ण वातावरण मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या निर्धाराने भारावून गेले.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मुंबईतील आझाद मैदान गाठले असून तिथे मोठे उपोषण सुरू होणार आहे. सकाळपासूनच आझाद मैदानावर समाजबांधवांची मोठी गर्दी उसळली आहे.
Local Body Elections : ग्रामविकास मंत्र्यांना भेटणार जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशन!
मुंबईत दाखल होताच मराठा आरक्षण चळवळीला नव्या उर्जेचा वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मराठा बांधवांचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, यानंतरच्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.








