व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र India is Hindu nation : भारत हा अखंड आणि हिंदू राष्ट्रच आहे...

India is Hindu nation : भारत हा अखंड आणि हिंदू राष्ट्रच आहे !

Mohan Bhagwats statement, discussion across the country : मोहन भागवत यांचे वक्तव्य, देशभरात चर्चा

New Delhi : “भारत हा अखंड आहे आणि हे हिंदू राष्ट्रच आहे” असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने देशभरात हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

“भारताचे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी हा आपल्या एकतेचा दूवा आहे. अखंड भारत ही राजकीय कल्पना नसून जनमानसातील सार्वजनिक मत आहे. भारत अखंड आहे आणि हिंदू राष्ट्र आहे ही भावना जेव्हा समाजात पूर्णपणे जागृत होईल, तेव्हा सर्व सुखी होतील आणि येथे शांतता नांदेल,” असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

Maratha movement : प्रचंड प्रतिसादात मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले !

भागवत म्हणाले की, भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी स्वतंत्र घोषणेची गरज नाही. “ऋषी-मुनी, संत, विभूती यांनी हे आधीच सांगितलेले आहे. हे ढळढळीत सत्य आहे. ते मानलं तर समाजाचा लाभ आहे; नाही मानलं तरी काही नुकसान नाही,” असे ते म्हणाले.

संघाविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या हेतूने भागवत यांनी संघाच्या कार्यपद्धती, शिस्तबद्ध कॅडर आणि शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. “संघ हा कुणाचाही विरोधक नाही. पूजा पद्धती वेगळ्या असल्या तरी ओळख एकच आहे. मुस्लीम समाजानेही ही शंका सोडावी की या परंपरेत सहभागी झाले तर त्यांचा इस्लामशी संबंध तुटेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यलढ्यापासून ते विविध सामाजिक आंदोलनां पर्यंत संघाने नेहमी योगदान दिले आहे, पण कधी वेगळा झेंडा हाती घेतला नाही, असे भागवत म्हणाले. “जिथे चांगलं काम सुरू आहे, तिथे स्वयंसेवक सेवा देतात. जात-पंथ-धर्म आड येत नाही. संघर्ष हा प्रगतीचा साधक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

संघ हा विरोधी मतांचाही आदर करतो, असे सांगत भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची उदाहरणे दिली. “चांगल्या कामासाठी संघ नेहमी तत्पर असतो, पण अडथळा आल्यास समोरच्याच्या इच्छेचा आदर करून बाजूला होतो,” असे ते म्हणाले.

Local Body Elections : ग्रामविकास मंत्र्यांना भेटणार जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशन!

आरक्षण हा तर्काचा नव्हे तर संवेदनशीलतेचा विषय असल्याचे भागवत यांनी म्हटले. “अन्याय होत असेल तर परिमार्जन आवश्यक आहे. राज्यघटनेत दिलेल्या आरक्षणाला संघाने सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही ही भूमिका कायम राहील,” असे त्यांनी सांगितले.

1972 मध्येच धर्माचार्यांनी अस्पृश्यतेला हिंदू धर्मात जागा नाही हे स्पष्ट केले होते, असा दाखला देत भागवत म्हणाले की, भारताची खरी ताकद ही विविधतेत आहे. “हिंदू धर्माचा एकच ग्रंथ नाही. विविधतेतूनच एकतेचे यमक आणि गमक आहे. याच सांस्कृतिक मिलाफाने भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Amol Mitkari : फडणवीसांनी देशाचं, तर अजित पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं

मोहन भागवत यांच्या या विधानाने देशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर गरमागरम चर्चेला तोंड फुटले आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेले हे वक्तव्य पुढील घडामोडींचा सूर ठरवणारे ठरू शकते.

error: Content is protected !!