व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र NEET paper leak : विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ बुलढाण्यात युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन;...

NEET paper leak : विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ बुलढाण्यात युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Youth Congress stages a semi-nude protest in Buldhana condemning the lathi-charge on students : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद बुलढाण्यात; युवक काँग्रेस-एनएसयूआयचे तीव्र आंदोलन

Buldhana दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध व्यक्त केला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे सरकार हाय हाय”, “पेपर लीक से आजादी”, “लोकशाही मागे आजादी”, “स्टुडंट मागे आजादी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

NEET Paper leak : उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र, सरकारविरोधात करणार संयुक्त शक्ती प्रदर्शन, हुल्लडबाजांना फोडून काढण्याचा खणखणीत इशारा

 

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ते विश्वदीप पडोळ यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे इंग्रजांच्या राजवटीची आठवण होत आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक असून जनता याला योग्य वेळी उत्तर देईल,” असे मत व्यक्त केले.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.

व्यापाऱ्याला मारहाण? आमदाराच्या मुलावर आरोप; तक्रार नसल्याने कारवाई नाही

या आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शिवराज पाटील, शहराध्यक्ष दत्ता काकस, शैलेश खेडकर, सुनील तायडे, विजय सपकाळ, तुषार खरे, ज्ञानेश्वर पचांगे, संदीप पैठणे, ओमसिंग राजपूत, अतुल सिरसाठ, श्याम सावंत, शेख इरफान, प्रवीण पाटील, भरत पाटील, भगवान गायकवाड, पंडितराव निकाळजे, अमोल मोरे, संदीप बोर्डे, अविनाश खरात, जितेंद्र बोर्ड, नीलेश गवळी, नितीन गायकवाड, गोपाल गिते यांच्यासह युवक काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!