व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashish Kapoor : इन्स्टा फ्रेंडवर वॉशरुममध्ये,,, अभिनेता आशीष कपूरला अटक

Ashish Kapoor : इन्स्टा फ्रेंडवर वॉशरुममध्ये,,, अभिनेता आशीष कपूरला अटक

Big stir in Bollywood Television world : बॉलिवूड – टेलिव्हिजन जगतात मोठी खळबळ

Pune : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आशीष कपूर अडचणीत सापडला आहे. दिल्लीतील हाऊस पार्टीदरम्यान झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी त्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर 11 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून तो फरार होता. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत अखेर पुण्यातून बेड्या ठोकल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आशीष कपूर यांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. ओळखीचं मैत्रीत रुपांतर झाल्यानंतर आशीषने तिला दिल्लीतील एका मित्राच्या घरी पार्टीसाठी बोलावलं. पार्टीदरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, आशीषने वॉशरुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

New GST rate : केंद्र सरकारचा दिवाळी धमाका! टीव्ही, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त !

सुरुवातीला महिलेनं आशीष कपूरसह त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि इतर दोघांवरही आरोप केले होते. इतकंच नाही, तर एका महिलेनं तिला मारहाण केली आणि घटनेचा व्हिडीओ शूट करण्यात आला, असंही तिने सांगितलं. मात्र नंतर जबाब बदलत तिनं फक्त आशीष कपूरवरच बलात्काराचा आरोप कायम ठेवला. दरम्यान, पोलिसांना कोणताही व्हिडीओ हाती लागलेला नाही.

11 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी आशीषचा शोध सुरू केला. त्याचं लोकेशन सुरुवातीला गोव्याचं दिसून आलं, त्यानंतर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. दिल्ली पोलिसांच्या पथकांनी गोवा आणि पुणे दोन्ही ठिकाणी छापे टाकले. शेवटी पुण्यातून त्याला अटक करण्यात आली.

आशीष कपूर हा छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये सक्रिय असलेला अभिनेता आहे. त्याने ‘सात फेरे’, ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून घराघरात ओळख मिळवली. तसेच ‘इनकार’, ‘कुर्बान’, ‘टेबल नंबर 21’ यांसारख्या चित्रपटांमधूनही त्याने भूमिका साकारल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या सहकलाकार अभिनेत्रीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे तो चर्चेत आला होता.

Blast at solar company : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट

सध्या आशीष कपूरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. कोर्टात त्याची हजेरी लावली जाणार असून पुढील चौकशीदरम्यान या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे टेलिव्हिजन आणि बॉलिवूडसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!