व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून नाराजी ची चर्चा !

Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून नाराजी ची चर्चा !

Fadnavis’ explanation: The order is from the Center : फडणवीसांचे स्पष्टीकरण : आदेश केंद्राचे

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरु आहे. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्याच्या आदेशांमुळे हा वाद उफाळल्याचे बोलले जात आहे. साडेचार लाख लोकसंख्या आणि जवळपास 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ड वर्ग महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश नगरविकास विभागास देण्यात आले आहेत. आतापर्यंत या महापालिकांवर बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. या निर्णयामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

राज्यात सध्या ड वर्गाच्या 19 महापालिका आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “महापालिकांमध्ये केवळ आयएएस अधिकारीच राहतील असे कुठे ठरलेले नाही. मात्र जिथे आयुक्तांच्या जागा आयएएसकरता नोटिफाईड आहेत, तिथे आयएएसची नियुक्ती न केल्यास केंद्र सरकार त्या जागा कमी करण्याचा प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे अशा ठिकाणी आयएएस अधिकारी देणे आवश्यक ठरते.”

OBC Reservation Fight : ..तर महाराष्ट्रात मनोज जरांगे एकटेच राहणार का ?

फडणवीस म्हणाले, “जर आयएएससाठी आरक्षित जागांना आपण आयएएस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार विचारते की इतक्या जागांची गरज तुम्हाला आहे का? त्यामुळे अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएस अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली जाते.”

Bacchu Kadu : ‘इतर केंद्रे सुरू करा, नाहीतर आम्हीच वाटप करू’

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्यानेही त्यांच्या नाराजीच्या चर्चां रंगल्या आहेत. याआधी अ, ब, क वर्गातील महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ड वर्ग महापालिकांवरही ही प्रक्रिया सुरू होत आहे. या हालचालींमुळे नगरविकास विभागातील मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप वाढल्याने शिंदे नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!