व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Food Security Scheme : ३१७८ लाभार्थ्यांचे १६९ क्विंटल धान्य फस्त केले!

Food Security Scheme : ३१७८ लाभार्थ्यांचे १६९ क्विंटल धान्य फस्त केले!

Scam by the in-charge ration shop dealer exposed : प्रभारी स्वस्तधान्य दुकानदाराचा घोटाळा उघड; तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश

Khamgao शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेंतर्गत गरीब व गरजूंसाठी असलेले धान्यच गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वस्तधान्य दुकानाच्या प्रभारी दुकानदाराने तब्बल ३१७८ लाभार्थ्यांच्या हक्काचे १६९ क्विंटल धान्य हडपल्याची तक्रार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांनी स्थानिक पुरवठा विभागाला दिले आहेत.

पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथील मजूर अजित मजूर यांनी दोन वर्षांपूर्वी स्वस्तधान्य दुकान चालविण्याचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लगतच्या कासारखेड येथील सुरेश खोटरे यांना या दुकानाचा तात्पुरता प्रभार सोपवण्यात आला. परंतु प्रभारी खोटरे यांनी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे धान्य वाटप करताना शिधापत्रिकाधारकांचे ठसे घेऊन फक्त दोन महिन्याचे धान्य दिले व उर्वरित एका महिन्याचे धान्य हडपल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Starvation issue : थकीत मानधनासाठी ग्रामरोजगार सहाय्यक आक्रमक

या दुकानांतर्गत अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेचे ६९२ शिधापत्रिकाधारक असून त्यातील ३१७८ लाभार्थ्यांना दरमहा गहू, तांदूळ आणि इतर धान्य मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी दरमहा १६९ क्विंटल धान्याचा कोटा असतो. तक्रारीनुसार हा कोटा तीन महिन्यांसाठी एकत्रित आला असताना फक्त दोन महिन्याचे वितरण करून उर्वरित धान्य गिळंकृत करण्यात आले.

या घोटाळ्यात प्रभारी दुकानदार खोटरे यांच्यासोबत खान भालेगावचे बी. एच. खान, शब्बीर खान गुलशन खान (पिंपळगाव राजा) यांचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवर सचिन सोनोने, गजानन वहिले, संतोष महाले, विलासराव देशमुख, पांडूरंग शिरसागर, योगेश सातव, हुसेन करीम, उस्मान करीम आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

PM Narendra Modi : एआयच्या माध्यमातून पंतप्रधानांची बदनामी; भाजपचे आंदोलन

११ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात सादर झालेल्या या तक्रारीनंतर तहसीलदार सुनिल पाटील यांनी तातडीने स्थानिक पुरवठा विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले. शिधापत्रिकाधारकांचे प्रत्यक्ष बयान घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

या प्रकरणात संबंधित प्रभारी दुकानदारावर कारवाईची मागणी होत असून, आगामी काळात राजकीय पातळीवरही या प्रकरणाला उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!