Prakash Ambedkar has alleged that Modi’s foreign economic policy has harmed the country and benefited Ambani : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप,
Mumbai वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र आर्थिक धोरणावर तीव्र टीका केली. “अमेरिका आणि रशियासोबतचे अपयशी संबंध हे ‘ग्रामर ऑफ अॅनार्की’ असून, त्याचा थेट फटका भारताच्या सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांना बसत आहे, तर यातून मोदींचे जिवलग उद्योगपती मुकेश अंबानी मात्र लाभ घेत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, “भारताचे पूर्वीचे परराष्ट्र धोरण हे अमेरिकेशी व रशियाशी संतुलन राखणारे होते. मात्र मोदींच्या चुकीच्या नेतृत्वामुळे हे संतुलन बिघडले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के प्रतिशुल्क लावले. त्यामुळे अमेरिका-भारत संबंध पुन्हा १९७० च्या दशकात पोहोचले आहेत. दुसरीकडे, रशिया चीनकडे झुकला असून व्यापारासाठी चीनी युआनवर आग्रही आहे. ही परिस्थिती भारतासाठी अत्यंत अडचणीची आहे.”
Sudhir Mungantiwar ; ‘केशवा… माधवा…’ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरांनी भारावले भजनी
रशियाकडून स्वस्तात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “युक्रेन युद्धानंतर भारताला सरासरी प्रति बॅरल ११ डॉलरचा फायदा झाला. २०२३-२४ मध्ये देशाने तब्बल ४४,८९३ कोटी रुपये वाचवले. पण सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल किंवा केरोसीनचे दर कमी मिळाले का? नाही! रिफायनऱ्यांनी स्वस्त तेलावर नफा कमावला आणि तो प्रामुख्याने निर्यातीद्वारे केला,” असा आरोप आंबेडकरांनी केला.
त्यांनी Reliance Industries आणि Nayara Energy या खासगी रिफायनऱ्यांचे आकडेवारीसह उदाहरण दिले. “२०२२ ते २०२५ दरम्यान रिलायन्सला कच्च्या तेलावरील व्यवहारातून प्रचंड नफा झाला. फक्त २०२४-२५ मध्येच कंपनीने सुमारे ५० हजार कोटींचा नफा कमावला. परंतु त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला नाही. पेट्रोल आजही ९५ रुपये आणि डिझेल ८८ रुपये प्रति लिटर दरानेच विकले जाते,” असे त्यांनी सांगितले.
Akola West : अकोला पश्चिम निवडणुकीचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणी
रशियन कंपनी Rosneft च्या गुंतवणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, “नायारा एनर्जीमध्ये ५१ टक्के हिस्सा असले तरी पाश्चात्य निर्बंधांमुळे रशियाला अपेक्षित नफा मिळालेला नाही. मग हा व्यवहार अखेरीस कोणाच्या फायद्यासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी की फक्त अंबानींसाठी?” असा सवाल आंबेडकरांनी केला.








