व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Anil Deshmukh: आधी स्वतःच्या मुलीच्या हातून ‘तुतारी’ काढून दाखवा; अनिल देशमुखांचे बाबा...

Anil Deshmukh: आधी स्वतःच्या मुलीच्या हातून ‘तुतारी’ काढून दाखवा; अनिल देशमुखांचे बाबा आत्रामांना जाहीर आव्हान

Anil Deshmukh attacks dharmarao atram : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला प्रत्युत्तर

Nagpur शिवसेनेतील ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यातच अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ‘पवारांची राष्ट्रवादी फुटणार’ असा दावा केल्याने राजकीय खळबळ उडाली. मात्र, त्यांच्या या दाव्याचा शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला असून आमचे खासदार फोडणे तर दूरच, आत्रामांनी आधी स्वतःच्या मुलीच्या हातून तुतारी काढून दाखवावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका करताना अनिल देशमुख म्हणाले की, आत्राम हे डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यात कोणतीही सत्यता नसून केवळ सनसनाटी निर्माण करून माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला आहे. बाबा आत्राम यांची स्वतःची मुलगी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांचे खासदार फोडण्याच्या गप्पा मारण्याऐवजी, आधी आपल्या मुलीच्या हातातील ‘तुतारी’ काढून तिला ‘घड्याळ’ हातात घ्यायला लावावे, असा टोला देशमुखांनी लगावला.

Nitin Raut: निवडणुकीच्या रणधुमाळीत निरीक्षक चीन दौऱ्यावर; काँग्रेसमध्ये नितीन राऊतांविरोधात संतापाचा ‘ब्लास्ट’!

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांचा समावेश होता आणि महायुतीच्या काळात त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून जबाबदारीही सांभाळली होती. महायुती सरकारने अलिकडेच मंत्रिमंडळात फेरबदल करताना छगन भुजबळ आणि बाबा आत्राम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना थांबवले होते, मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना मंत्रिमंडळ पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला दिला होता, परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाबा आत्राम यांना अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा शब्द अजितदादांनी दिला होता, असा दावा आत्राम समर्थकांकडून केला जात आहे.

Devendra fadnavis : “एकच सरकार असताना दुजाभाव का?” मुख्यमंत्री फडणवीसांचा केंद्राला सवाल !

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील वर्धा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमर काळे हे विजयी झाले असले, तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात खातेही उघडता आले नाही. नागपूर जिल्ह्यातून रमेश बंग, सलील देशमुख आणि दुनेश्वर पेठे या तिन्ही प्रमुख उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बळकट करण्याचे मोठे आव्हान दोन्ही गटांसमोर असतानाच, आता खासदार फुटीच्या दाव्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

error: Content is protected !!