व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना

Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना

Resolution passed in the General Body remains unimplemented; Chairman pulls up officials : अतिक्रमण हटवा, नालेसफाईत कसूर नको, सभापतींचे आदेश

Akola महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या विविध बैठकींमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक ठरावांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर शारदा खेडकर होत्या. यावेळी स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल, सभागृह नेते पवन महल्ले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत नगररचना, अतिक्रमण आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) विभागांअंतर्गत मंजूर ठरावांचा आढावा घेण्यात आला. सभापती विजय अग्रवाल यांनी विभागनिहाय कामकाजाची माहिती घेत अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Operation tiger : सहा खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन

शहर विकासाशी संबंधित कोणतीही फाईल अथवा नागरिकांच्या तक्रारी अनावश्यकपणे प्रलंबित राहू नयेत, अशी स्पष्ट सूचना लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना दिली. विकासकामांमध्ये गती आणून ठरावांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे, विठ्ठल देवकते, राजेश सरप, नगरसेवक नितीन ताकवाले, अमोल मोहोकार, हर्षद भांबेरे, माजी नगरसेवक तुषार भिरड, सहाय्यक नगररचनाकार मृणालिनी मानतकर, संदीप गावंडे, अनिल बिडवे यांच्यासह विविध विभागांचे कनिष्ठ अभियंते आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

OBC protest : ओबीसींच्या सात प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; 1 जुलैला धरणे आंदोलन

बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची पाहणी करून विनापरवानगी सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटीस बजावून कामे थांबविण्याची कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले. आगामी पावसाळा लक्षात घेता नालेसफाईची कामे प्रभावीपणे पूर्ण करून पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

error: Content is protected !!