व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation Tiger : गद्दारांना जनता धडा शिकवेल; बुलढाण्यात ठाकरे गटाचा इशारा

Operation Tiger : गद्दारांना जनता धडा शिकवेल; बुलढाण्यात ठाकरे गटाचा इशारा

Shivsena party workers express anger against rebel MPs; reaffirm their resolve to stand with Uddhav Thackeray : फुटीर खासदारांवर शिवसैनिकांचा संताप; उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार

Jalgao Jamod शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या जिल्हास्तरीय बैठकीत पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला.

बुलढाणा येथे १७ जून रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर होते. यावेळी बोलताना त्यांनी पक्षाची साथ सोडणाऱ्या खासदारांवर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय आव्हाने आणि पक्षविस्ताराबाबत मार्गदर्शन केले. पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा करण्यात आली.

Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना

यावेळी शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, पीकविमा, भरपाई, वाढती महागाई तसेच खते व बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींबाबत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलने आणि मोर्चे उभारण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीला सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, गजानन ढोसर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!