Khadakpurna overflows; 19 gates opened : ५० सेमीने पाण्याचा विसर्ग, जिल्ह्यातील या गावांना दिला सतर्कतेचा इशारा
Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लाे झाला प्रकल्पाची सर्वच १९ गेट उघडण्यात आली आहेत. हे सर्व गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पही तुडुंब भरला आहे.या प्रकल्पाचे पाच गेट २० सेमीने उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सिंचनासह पाणीपुरवठा याेजनेसाठी महत्वाचे असलेल्या संत चाेखासागर प्रकल्पाच्या क्षेत्रात जाेरदार पाउस झाला आहे. त्यामुळे, प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प १०० टक्के भरला आहे.या प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा ९३.४० दलघमी आहे व पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत ५२९ मीटर जलाशय पातळी आहे. प्रकल्पाचे पाणी प्रकल्प शेजारील गावात शिरू शकते, त्यामुळे सर्व म्हणजे १९दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात पाणी सोडले आहे.त्यामुळे खडकपूर्ण नदीला पूर आहे. सध्या नदीपात्रात १३२६ घन सेमी, ४६ हजार ८५४ घन फूट सेमी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात आणखी पाउस झाल्यास प्रकल्पातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !
नदीकाठावरील गावापैकी देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रुक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगाव व सावरगाव तेली गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.








