व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण गोकुळ’ अखेर महायुतीच्या ताब्यात; सतेज पाटलांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी

गोकुळ’ अखेर महायुतीच्या ताब्यात; सतेज पाटलांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी

महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १६ तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पडली १३ मते

Mumbai : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १६ तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला १३ मते मिळाली. या विजयामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी घेतला आहे.

निवडणुकीत काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सर्वाधिक १३ संचालक निवडून आले होते, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे १२ संचालक विजयी झाले होते. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक ‘कोरम’ पूर्ण होत नसल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडवण्यासाठी महायुती सरकारने सहकार कायद्याचा वापर करत चार शासकीय सदस्यांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचे अधिकार दिले. याविरोधात विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने याचिका फेटाळली. सोबतच न्यायालयाने त्यांचे मतदान वेगळे घेणयाची सूचना केली होती.

नक्षल दहशतीच्या सावटाखालील परसवाडीत लोकशाहीचा दीप उजळला; आमदारांनी ग्रामस्थांसोबत साजरी केली दिवाळी

शासकीय सदस्यांच्या चारही मते महायुतीच्या पारड्यात पडल्याने महायुतीचा विजय निश्चित झाला. महायुतीने बळजबरीने संघ ताब्यात घेतल्याचा आणि गोकुळ ब्रँड गुजरातच्या ‘अमूल’ला विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर हा संपूर्ण खेळ रचल्याचा दावाही सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला.

भाजपमध्ये नवे-जुने नेते आमनेसामने? अंतर्गत अंतराच्या चर्चेला उधाण

मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील, तर महाविकास आघाडीकडून शशिकांत पाटील रिंगणात होते. मतदानात राजेश पाटील यांना चारही शासननियुक्त सदस्यांसह एकूण १६ मते मिळाली, तर शशिकांत पाटील यांना १३ मते मिळाली. या विजयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!