व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन

आमदार मांगुळकर यांची सरकारवर टीका; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध

Yavatmal : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून, शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने कर्जबाजारीपणाचे संकट अधिक गडद होत आहे. नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारपेठेतील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या धोरणांचा निषेध करण्यासाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने द्यायची, त्यांच्या नावाने विविध घोषणा करायच्या; मात्र प्रत्यक्ष मदतीची वेळ आली की सरकारने हात वर करायचे, अशीच भूमिका सध्या दिसून येत असल्याचे ते म्हणाले. संकटांच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक मदत मिळत नसून, त्यांच्या कष्टांची आणि अडचणींची जणू थट्टाच केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनीही केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करीत असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक बोबडे, प्रदेश सचिव वसीम अन्सारी, संजय वानखडे, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इंजि. प्रकाश जानकर, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, तालुकाध्यक्ष रमेश भिषणकर, शहराध्यक्ष प्रा. अनिल उर्फ बबलू देशमुख, विक्की राऊत, संतोष बोरले, प्रमोद बगाडे, अनुप नैताम, किशोर बडे, नईम पैलवान, राजेंद्रसिंग गौतम, शैलेश गुल्हाने, गजानन नवदुर्गे, नारायण राठोड, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाफर खान यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?

याशिवाय नंदू कुडमेथे, गुलाब कुडमेथे, शशांक केंढे, सुरेश नरवाडे, राजेश काटेकर, मनोज पाचघरे, व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष मारोतराव पडळ, विजय खरोंडे, मिलिंद ढेरे, कैलास राठोड, अंकुश तराळे, कुणाल जानकर, रोहिदास जाधव, मुजफ्फर पटेल, रमेश पटकुळे, देवराम मेश्राम आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!