Information about Narendra Jadhav after the committee meeting : समितीच्या बैठकीनंतर नरेंद्र जाधवांची माहिती
Mumbai : शासनाच्या त्रिभाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली. या समितीचे अध्यक्ष माजी खासदार आणि शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली.
बैठकीत समितीचे कामकाज कसे होणार याची दिशा ठरवण्यात आली. त्रिभाषा धोरणाबाबत लोक आणि पालकांची मते जाणून घेण्यासाठी विशेष वेबसाईट व लिंक तयार करण्यात आली असून त्यावर थेट सूचना आणि मते नोंदवता येतील. याशिवाय एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे जी शिक्षणसंस्था, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मराठी भाषेशी संबंधित संस्थांना पाठवली जाणार आहे. या प्रश्नावलीत “त्रिभाषा कोणत्या इयत्तेपासून असावी?”, “भाषा शिकवण्याची पद्धत कशी असावी?” असे महत्त्वाचे प्रश्न असतील.
Vidarbha Farmers : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा आक्रोश
माशलकर समितीने 2021 मध्ये पहिलीपासून 12 वीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा असाव्यात, अशी शिफारस केली होती. मात्र शासनाने यावर निर्णय घेतल्यानंतर मोठा विरोध झाला आणि नवी समिती स्थापन करण्यात आली.
नव्या समितीने राज्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष दौरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यांमध्ये लोकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना गोळा करण्यात येणार आहेत. समितीने स्पष्ट केले आहे की दौऱ्यांदरम्यान स्वतःची कोणतीही भूमिका मांडली जाणार नाही.
दौर्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
8 ऑक्टोबर : छत्रपती संभाजीनगर, 10 ऑक्टोबर : नागपूर, 30 ऑक्टोबर : कोल्हापूर, 31 ऑक्टोबर : रत्नागिरी, 11 नोव्हेंबर : नाशिक, 13 नोव्हेंबर : पुणे
21 नोव्हेंबर : सोलापूर
Solar Agricultural Feeder Project : सौर कृषी वाहिनी प्रकल्प स्थलांतरित खरा, गावकऱ्यांची मागणी
त्यानंतर अंतिम बैठक मुंबईत होणार असून त्यामध्ये प्रमुख नेत्यांनाही भेट घेण्यात येईल. समिती 5 डिसेंबरपर्यंत शिफारशींसह अहवाल सरकारकडे सादर करणार असून अंतिम निर्णय शासन घेणार आहे. कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.








