व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Narendra Modi : “८०च्या दशकात नरेंद्र मोदींना पहिल्यांदा भेटलो !

Narendra Modi : “८०च्या दशकात नरेंद्र मोदींना पहिल्यांदा भेटलो !

Remembering Amit Shah, when he was working for the RSS : अमित शाहांची आठवण, तेव्हा ते संघाचं काम करत होते

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजकीय जोडी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गुजरातपासून केंद्रापर्यंत दोघांनी सोबत काम केलं आहे. पण त्यांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. याच संदर्भात अमित शाह यांनी एका मुलाखतीत नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली, याचा किस्सा सांगितला.

शाह म्हणाले, “मी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना ८०च्या दशकाच्या सुरुवातीला भेटलो. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून ते अहमदाबादमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी ते मी जिथे राहत होतो तिथे आले होते.”

Viral clip of Haake : पैशासाठी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने हाकेंची काढली लाज!

त्यांनी पुढे सांगितले की, “तेव्हा आम्ही खूप तरुण होतो. मोदीजींनी आरएसएसचं काम, संघाची भूमिका आणि देशाला कसं बदलता येईल, याबद्दल अतिशय मुद्देसूदपणे सांगितलं. त्यांनी शेवटी उपस्थितांना सांगितलं की, आरएसएसबद्दल खरं जाणून घ्यायचं असेल, तर यांना ऐका. त्या कार्यक्रमात मी आणि इतर तरुणही तयारीत मदत करत होतो, आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला.”

Loan waiver : 248 शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्यावी लागणार

अमित शाह म्हणाले, “तेव्हा मी संघाचा स्वयंसेवक होतो. पण पुढे मी भाजपसोबत काम सुरू केलं. आम्ही दोघंही भाजपसाठी काम करत गेलो. जसं कोट्यवधी कार्यकर्ते आज भाजपसोबत जोडले गेले आहेत, तसं आम्हीही पक्षासाठी काम करत होतो.”

Food Security Policy : हे कसले अन्नसुरक्षा धोरण? १५ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार

शाह यांनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबद्दलही भाष्य केलं. “पक्षाचा अध्यक्ष निवडताना पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते. पण ती फक्त पंतप्रधानांचीच नसते, तर संपूर्ण पक्षाची असते. माझ्या व्यतिरिक्त कुठलाही कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकला असता. नंतर नड्डाजी अध्यक्ष झाले,” असं ते म्हणाले.

अमित शाहांच्या या आठवणीमुळे मोदी-शाह यांच्या नात्याचा सुरुवातीचा टप्पा समोर आला असून, दोघांच्या दीर्घ राजकीय सहकार्याला वेगळाच ऐतिहासिक संदर्भ मिळाला आहे.

___

error: Content is protected !!