Uddhav Balasaheb Thackeray : कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात तूर, सोयाबीनच्या पेंढ्या फेकल्या

Protest by throwing toor dal in the office of agriculture officers : ठाकरे गटाचे आंदोलन, ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी

Amravati चालू हंगामात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीतील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी तसेच सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गुरुवारी कृषी विभागावर आक्रमक पवित्रा घेतला.

शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शेंगा नसलेले सोयाबीन, तूर व पेंढा कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात फेकून शासनाविरोधात संताप व्यक्त केला. हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झाले.

Controversial again : याला द्या रे मुख्यमंत्रीपद ! आम्ही गोट्या खेळायला आलो आहोत का ?

अतिवृष्टीमुळे अमरावतीसह राज्यातील सोयाबीन, तूर, कापूस व अन्य पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके जवळपास संपुष्टात आली आहेत. दरम्यान, शासनाने ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद केल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे, अशी टीका पदाधिकाऱ्यांनी केली.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, “शासनाने तातडीने जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरकू देणार नाही.” कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरसकट पंचनामे करून जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहावे, अशी मागणी करण्यात आली.

Dandiya : नवरात्रीतील दांडिया खेळाला ‘हांडगेपणा’ म्हणत !

या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख पराग गुडधे, नरेंद्र पडोळे, ननोज कडू, विजय ठाकरे, प्रमोद धनोकार, कपिल देशमुख, नितीन हटवार, शिवराज चौधरी, सचिन ठाकरे, वैभव मोहोकार, आदित्य ठाकरे, राजेश बंह, रामा सोळंके, विजय आमोदकर, विजय पाचगरे, दिलीप काळे, प्रदीप गौरखेडे, सतीश हरणे, मनोज साबले, विजय तायडे, संजय पिंगळे, कैलास अवघड, प्रवीण रोडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.