Impact on home, auto and personal loan installments :गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांवरपरिणाम ?
New Delhi : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत देशभरातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेपो दर कमी होऊन गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचे हप्ते हलके होतील अशी आशा होती. मात्र आरबीआयने रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करता ते होते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या रेपो दर ५.५० टक्के आहेत आणि ते कायम ठेवले गेले आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. हप्ते ‘जैसे थे’ राहणार असल्याने कर्जदारांना दिलासा मिळणार नाही, मात्र स्थिरता कायम राहणार आहे.
Philippine Earthquake : फिलीपाईन्सला 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा
एमपीसीची ही या वर्षातील चौथी बैठक होती. बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत रेपो दराबाबत घोषणा केली. त्यांनी सांगितले की जागतिक वित्तीय परिस्थितीतील आव्हानांनंतरही देशातील आर्थिक वाढ सकारात्मक दिशेने आहे. यामध्ये चांगल्या मान्सूनचा आणि इतर घटकांचा मोठा वाटा आहे.
https://sattavedh.com/asia-cup-2025-ashish-shelar-rajeev-shukla-surrounded-made
गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले की, “सर्व घटकांचा विचार करून, वित्त धोरण समितीने सविस्तर चर्चा केली आणि एकमताने रेपो दर ५.५ टक्के जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.” यामुळे कर्जदारांसाठी हप्त्यांमध्ये घट होण्याची अपेक्षा फोल ठरली असली तरी स्थिर दरामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.








