ATS action: अमरावतीत एटीएसची मोठी कारवाई!

11 people arrested with weapons; including political figures : 11 जण शस्त्रांसह अटक; राजकीय व्यक्तींचाही समावेश

Amravati : अमरावतीच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी धडक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी एकत्रित मोठी कारवाई करत तब्बल 11 जणांना शस्त्रांसह पकडले आहे. यात राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरच्या रात्री दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या कारवाईत ब्राह्मण सभा कॉलनी परिसरातील एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. येथे हरियाणा राज्यातील पाच संशयित इसमांना शस्त्रांसह अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय घराचा यात संबंध आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Amol Mitkari : आमदार मिटकरी यांच्या कार्यशैलीवर पदाधिकाऱ्यांचा रोष

दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंपाजवळ संशयितांना पकडण्यात आले. या ठिकाणी सहा जण शस्त्रांसह पोलिसांच्या हाती लागले. दोन्ही ठिकाणी संशयितांकडून पोलिसांवर गोळीबार झाल्याची चर्चाही स्थानिकांमध्ये रंगली आहे. अखेर पोलिसांनी वेळीच प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Akola Municipal Corporation election : अकोला पूर्वमध्ये काय चुकले? एकही नगरसेवक नसल्याची काँग्रेसला खंत

एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रांची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड एटीएस आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांची ही कारवाई दसऱ्याच्या दिवशी पार पडल्याने या घटनेबाबत अमरावती जिल्ह्यात तसेच परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.