Political Equations Shifted After Ward-Wise Reservation : प्रभागनिहाय आरक्षणानंतर बदलले राजकीय समीकरण
Buldhana जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. २८६ नगरसेवक पदांसाठीच्या आरक्षण सोडतीने अनेकांची चार वर्षांची तयारी उधळली, तर काहींसाठी अनपेक्षितपणे ‘सोन्याची चिठ्ठी’ ठरली आहे. एका फटक्यात अनेकांचे राजकीय गणित बिघडले असून, आता खऱ्या अर्थाने स्थानिक राजकीय रणसंग्रामाला प्रारंभ झाला आहे.
बुलढाणा: शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत अपेक्षित. दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेली ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वात चर्चेची ठरणार आहे.
खामगाव: महायुतीतीलच संघर्ष! भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट). राष्ट्रवादीने ताकद दाखविण्याचा शह-मात डाव आखला आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर, सरकारवर हल्ला
चिखली: भाजप विरुद्ध काँग्रेस — ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. स्थानिक नेत्यांनी प्रचारयंत्रणा सज्ज ठेवली आहे.
इतर नगरपालिकांतील प्रमुख चित्र
मेहकर: शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना — घरचीच लढत, स्थानिक पातळीवर रोचक घडामोडी सुरू.
जळगाव जामोद: प्रथमच अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद राखीव, त्यामुळे सर्वच पक्षांचा उमेदवार शोध मोहिमेचा वेग वाढला.
नांदुरा: भाजप विरुद्ध नगरविकास आघाडी अशी रंगणार लढत.
शेगाव: भाजप-काँग्रेसचा पारंपरिक सामना पुन्हा रंगणार.
सिंदखेडराजा: महिला आरक्षणामुळे इच्छुकांचे गणित कोलमडले; दोन राष्ट्रवादी गटांमधील स्पर्धेत भाजप हस्तक्षेपाची शक्यता.
देऊळगाव राजा: नगराध्यक्षपद खुले; सर्वच पक्ष योग्य चेहरा शोधण्यात व्यस्त.
आरक्षणानंतर स्थानिक पातळीवर गुप्त बैठकांचा आणि तडजोडींचा सिलसिला सुरू झाला आहे. काही ठिकाणी “योग्य वेळी मोहरा टाकायचा” अशी रणनीती आखली गेली आहे. अनेक ठिकाणी आघाड्यांचे संकेत, तर काही ठिकाणी अंतर्गत असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
एकूण आरक्षणाचे चित्र
एकूण जागा: २८६
सर्वसाधारण: १६९
महिला राखीव: १४५
ओबीसी: ७७
अनुसूचित जाती: ३७
अनुसूचित जमाती: ३
महिलांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती – २१
अनुसूचित जमाती – ३
ओबीसी – ४१
सर्वसाधारण – ८०
Attack on CJI : त्या वकिलावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जिल्हा संघटनेची मागणी
२०२२ नंतर झालेल्या सत्तांतरानंतर या नगरपालिका निवडणुका राज्याच्या नव्या राजकारणाचे लघुरूप आरसा ठरणार आहेत. शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजप अशा चार प्रमुख पक्षांसोबत स्थानिक आघाड्याही समीकरणात उतरणार आहेत.








