IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !

FIR against 14 senior officers including DGP : डीजीपीसह 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एफआयआर

New Delhi : देश हादरवणाऱ्या हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्य प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. 9 ऑक्टोबरच्या रात्री चंदीगड पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे हरियाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर, रोहतकचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांच्यासह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केल. हरियाणाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे डीजीपीसह अनेक वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रकरण दाखल झाले आहे.

गुरुवारपर्यंत पुरण कुमार यांच्या कुटुंबाने मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांच्यासह 15 अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. मात्र दाखल झालेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केलेले नाही. या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकारी आणि पुरण कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी एफआयआरच्या स्वरूपावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी चंदीगड पोलिसांकडे लेखी अर्ज सादर करत एफआयआरमध्ये आरोपी अधिकाऱ्यांची नावे स्वतंत्रपणे नमूद करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी चंदीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांच्याशी चर्चा केली असून, एफआयआर एका निश्चित स्वरूपात लिहिला जावा अशी मागणी केली आहे.

Arvind Sawant : ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीत ठिय्या!

दरम्यान, पुरण कुमार यांच्या पोस्टमार्टमबाबत अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दलित संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हरियाणातील अनुसूचित जाती समुदायातील आयएएस, आयपीएस आणि एचसीएस अधिकारी खुलेपणाने पुरण कुमार यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचा आरोप आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीय पूर्वग्रहातून आणि वैयक्तिक वैरातून पुरण कुमार यांना सतत छळले आणि त्यांच्या वरिष्ठतेकडे दुर्लक्ष करून वारंवार खालच्या दर्जाच्या नॉन-केडर पोस्टिंगवर पाठवले.

Heavy Rains Cause Crop Damage : तुटपुंजी मदत शेतकऱ्याने सरकारला केली परत !

मार्च 2023 मध्ये पुरण कुमार यांची आयजी होमगार्ड म्हणून नियुक्ती झाली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती की त्यांना अस्तित्वात नसलेल्या पदावर नेमले गेले आहे. नऊ महिन्यांनंतर, नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांची बदली आयजी दूरसंचार म्हणून झाली हे कॅडर पद असलं तरी, पोलिस विभागातील मुख्य प्रवाहातील मानले जात नाही. एप्रिल 2025 मध्ये अखेर त्यांना रोहतक रेंजच्या आयजी पदावर नियुक्ती मिळाली, मात्र या नेमणुकीमुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला.

Radhakrushna Vikhe Patil : ‘आरक्षणावरून दुही पसरविण्याचे पाप शरद पवारांचे!’

अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना खाली आणण्यासाठी प्रयत्नशील होते, असा आरोपही त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. पाच महिन्यांनंतर, 29 सप्टेंबर 2025 रोजी पुरण कुमार यांना रोहतक रेंजच्या आयजी पदावरून हटवून सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात बदली करण्यात आली. तेथे रुजू झाल्यानंतर त्यांनी 2 ऑक्टोबरपासून पाच दिवसांची रजा घेतली होती. 8 ऑक्टोबर रोजी ड्युटीवर परत येणे अपेक्षित असतानाच, 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी चंदीगडमधील आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

या घटनेनंतर संपूर्ण हरियाणा पोलिस दल आणि प्रशासनात मोठा धक्का बसला असून, पुरण कुमार यांच्या छळ आणि नॉन-केडर पोस्टिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

____