व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Local body elections : मित्रपक्षांना त्रास नको, पण स्वबळाचा अधिकार जिल्हाध्यक्षांना !

Local body elections : मित्रपक्षांना त्रास नको, पण स्वबळाचा अधिकार जिल्हाध्यक्षांना !

Fadnavis clarifies his stance on local elections : स्थानिक निवडणुकांवर फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका

Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीतून, याचा अंतिम निर्णय आता जिल्हा पातळीवरच घेतला जाणार असून, त्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आला आहे. मात्र, या स्वातंत्र्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की “आपण महायुतीत आहोत, हे विसरू नका. मित्र पक्षांना त्रास होईल असे पाऊल उचलू नका.”

मुंबईत झालेल्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत स्थानिक पातळीवरील निवडणूक धोरणावर सविस्तर चर्चा झाली. फडणवीस यांनी सांगितले की, “निवडणुका स्थानिक परिस्थिती पाहून लढा, पण महायुतीची भावना कायम ठेवा. आपण एकत्र आहोत हे प्रत्येक कृतीतून दिसले पाहिजे.”

Collector Office : अवैध धंद्यांच्या आहारी गेलेल्या लोकांना सावरण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले !

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक विस्तारावरही भर दिला. “नवीन लोकांना प्रवेश द्या, त्यांना स्वीकारा आणि संघटना अधिक बळकट करा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, “आपण टीका करावी, पण महायुतीत आहोत हे लक्षात ठेऊनच,” असा सूचक सल्लाही त्यांनी दिला.

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गट व भाजप नेत्यांमधील अलीकडच्या वादांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा हा संदेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना “संघर्ष हवा पण तो मर्यादेतला हवा,” असे सांगितल्याची चर्चा आहे.

Vijay Wadettiwar : त्याच्या मानगुटीवर हिंदुत्वाचं भूत बसलंय !

दरम्यान, भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची “स्वबळावर लढायची” मागणी असली तरी शीर्ष नेत्यांचा कल मात्र महायुतीतून लढण्याकडेच आहे.

राज्यभरातील सर्व विभागांत फडणवीस आणि रविंद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या मालिकेतून पक्षाची नाडी तपासत आहेत. एकूणच, जिल्हाध्यक्षांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले असले तरी निवडणुका महायुतीच्या चौकटीतच लढल्या जाणार, हे स्पष्ट संकेत भाजपकडून दिले गेले आहेत.

______

error: Content is protected !!