Devendra fadnavis : शेतमजूर दाम्पत्यासाठी ‘देवाभाऊ’ धावले

Parents witness their daughter’s funeral : आई-वडिलांना घडलं लेकाचं अंत्यदर्शन

Mumbai : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एका गरीब शेतमजूर दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परदेशात कामासाठी गेलेल्या त्यांच्या मुलाचा दुबईत मृत्यू झाला, आणि या वयोवृद्ध आई-वडिलांना तीन दिवसांनंतरच ही वार्ता कळली. गरिबीमुळे काय करावं, कोणाकडे धाव घ्यावी, हेच त्यांना सुचेना. पण, केवळ एका मेसेज वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन दुबईपासून नांदेडपर्यंत सर्व यंत्रणा हलवली.

किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील शेतमजूर अंगरवार दांपत्याचा मुलगा श्याम अंगरवार, वय केवळ 27 वर्षे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने श्यामने शिक्षणानंतर दुबई गाठली. तेथे एका बांधकाम कंपनीत कामाला लागला. मेहनतीने थोडे पैसे साठवून तो आई-वडिलांची गरीबी झाकण्याचा प्रयत्न करत होता.

Local body election : ठाकरे बंधुंसोबत युती नको; काँग्रेस स्वबळावर लढणार!

25 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस झाला कुटुंबासाठी तोच अभिमानाचा दिवस. पण, श्यामला ताप आला आणि त्याला दुबईतील एनएमसी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

गावातील कोणीही काय करावे हेच समजत नव्हते. अशावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते गोवर्धन मुंडे यांनी ही माहिती जाणून घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक एसएमएस पाठवला. त्यात लिहिलं होतं “दुबईत नांदेडच्या शेतमजुराचा मुलगा मरण पावला आहे, आई-वडील काहीच करू शकत नाहीत. कृपया मदत करा.”

Local body election : राज ठाकरे यांनाही काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा;

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताबडतोब परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. दुबईतील भारतीय दूतावासाशी समन्वय साधला. मृत्यूचा दाखला मिळवणे, पार्थिव परत आणण्याची प्रक्रिया सुरू करणे या सगळ्या गोष्टी वैयक्तिकरीत्या फडणवीस यांनी लक्षात घेतल्या. इतकंच नव्हे तर, “खर्चाची काळजी मी घेतो” असं स्पष्ट सांगून त्यांनी वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची तयारी दर्शविली

12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री, श्यामचं पार्थिव दुबईवरून विमानाने हैद्राबाद विमानतळावर आणण्यात आलं.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्काळ व्यवस्था केली, आणि किनवटपर्यंत पार्थिव पोहोचविण्यात आलं.
रविवारी गावात श्यामचा अंत्यविधी पार पडला. शोकाकुल वातावरणात आई-वडिलांनी आपल्या लेकाचं शेवटचं दर्शन घेतलं.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री

“आमचा देवावरचा विश्वासच ढळला होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आधार दिला. आमचा लेक पाहायला मिळाला, हेच आमचं भाग्य,” असं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्यामच्या वडिलांनी सांगितलं.

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, नेता फक्त सत्तेसाठी नसतो तो माणसांसाठी असतो. एका गरीब दांपत्याच्या वेदनांना ओळखून त्यांना त्यांच्या लेकाचं शेवटचं दर्शन घडवणाऱ्या या कृतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवासारखे धावून आले अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

____