Local Body Elections : झेडपीच्या मातब्बरांवर आली चाचपडण्याची वेळ !

Women and Other Category Reservations in Leaders’ Traditional Circles : नेत्यांच्या परंपरागत सर्कलमध्ये महिला व इतर प्रवर्गांचे आरक्षण

Nagpur : जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आरक्षणाने प्रस्थापित मातब्बर नेत्यांची दाणादाण उडवली आहे. इच्छुक आणि अनुभवी असलेल्या नेत्यांचे सर्कल महिलांसाठी किंवा इतर प्रवर्गांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांना आपल्या परंपरागत सर्कलवर पाणी सोडावे लागत आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून असलेले अस्तित्व राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय राहणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे असे नेते आता इतर सर्कलच्या शोधात निघालेले आहेत.

सर्कलसाठी भटकंती करणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपचे प्रबळ दावेदार असलेले जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, दुसरे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश शिंदे, प्रकाश खापरे, राजकुमार कुसुंबे, काँग्रेसचे मिलींद सुटे, रुपराव शिंगणे, आतिश उमरे, दुधराम सव्वालाखे, संदीप सरोदे, समीर उमप यांचा समावेश आहे. यांतील काही नेत्यांचे सर्कल महिलांसाठी तर काहींचे इतर प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

Vijay Wadettiwar : नेहरुंनी कधीच नालीतून गॅस शोधला नाही !

दशकभरानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुरूषाकडे जाणार आहे. पण यावेळी आरक्षणामध्ये अनेक दिग्गजांचे सर्कल हिरावले गेले आहेत आणि महिलांना ५० टक्क्यांपेक्षाही जास्त आरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे बरेच जण दुसऱ्या सर्कलच्या शोधात आहेत. उपरोक्त यादीतील काही नेत्यांनी इतर सर्कलची चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटचे सहकारी अनिल निधान हे कामठी विधानसभा मतदारसंघातील इतर सर्कलसाठी प्रयत्न करीत असल्याचीही माहिती आहे.

Accepted Member : जिल्हा परिषदेत 5 पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य !

भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे सावनेर विधानसभा मतदारसंघातील इतर सर्कलसाठी तयारी करीत असल्याचे सांगण्यात येते. दुसरे जिल्हाध्यक्ष हेसुद्धा अशाच प्रयत्नात दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणातील मातब्बर नेते इतर सर्कलाठी प्रयत्न करीत असले तरी यांतील काहींनी आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.