व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Naxalism : गडचिरोलीत 1980 पासून हिंसाचारात 538 सामान्यांचा बळी

Naxalism : गडचिरोलीत 1980 पासून हिंसाचारात 538 सामान्यांचा बळी

347 Maoists killed, 4213 arrested and 1522 surrendered : 347 माओवादी ठार, 4213 अटक आणि 1522 आत्मसमर्पण

Gadchiroli : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा गेली चार दशकं माओवादी चळवळीचं केंद्र राहिलं आहे. 1980 साली सुरू झालेल्या माओवादी सशस्त्र चळवळीने राज्याच्या सुरक्षायंत्रणेला आणि सामान्य नागरिकांना सतत धक्क्यात टाकलं आहे. या काळात माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचा बळी घेतला असून या आकड्याने या भागातील नक्षलवाद किती खोलवर रुजला होता हे स्पष्ट होतं.

राज्यातील पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या सततच्या कारवायांमुळे गेल्या काही वर्षांत माओवादी चळवळीला मोठा फटका बसला आहे. पोलिसांच्या आकडेवारी नुसार 1980 पासून आजपर्यंत 4213 माओवादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. विविध मोहीमांदरम्यान पोलिसांनी 347 माओवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय पोलिसांच्या जनजागृती मोहिमेमुळे आणि आत्मसमर्पण धोरणामुळे 1522 माओवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.

Opponents anger : लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे !

माओवाद्यांच्या कारवाया विशेषतः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये केंद्रित राहिल्या आहेत. सुरक्षाबलांच्या सततच्या ऑपरेशन्समुळे आणि स्थानिक लोकांच्या वाढत्या सहकार्यामुळे या भागातील माओवादी प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. तरीसुद्धा काही दुर्गम भागात अद्यापही माओवादी उपस्थिती कायम असल्याचं सुरक्षा यंत्रणांचे म्हणणं आहे.

Major changes: मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडले

राज्य सरकारने अलीकडच्या वर्षांत माओवादी प्रभावित भागांमध्ये विकासकामांना गती दिली आहे. रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे आणि रोजगाराच्या संधी वाढवून या भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांच्या मते, विकास आणि सुरक्षा या दोन्हींच्या संतुलित प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा हळूहळू शांततेकडे वाटचाल करत आहे.

error: Content is protected !!