Distribution of Substandard Rice Ahead of Diwali : पुरवठा यंत्रणेत गैरव्यवहार?, अर्धा तांदूळ, अर्धी चूरी – ग्राहक त्रस्त
Buldhana डोणगावसह मेहकर तालुक्यात रेशनमधून मिळालेला तांदूळ निकृष्ट, चूरीयुक्त आणि दुर्गंधीयुक्त असल्याने गरीबांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि महागाईच्या झटक्याने आधीच त्रस्त असलेल्या जनतेला दिवाळीच्या अगोदरच मिळालेला हा “सडका शिधा” म्हणजे शासनाच्या दुर्लक्षाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
स्थानिक रेशन दुकानदारांकडून वितरित करण्यात आलेल्या तांदळात अर्ध्याहून अधिक चुरी आणि उग्र वास असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. काही ठिकाणी तांदूळ शिजवताना विचित्र वास येत असल्याने नागरिकांनी तो वापरण्यास नकार दिला. “हा तांदूळ शिजवावा की खीर करावी?” असा प्रश्न अनेक गरीब कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
Municipal Corporation Elections : महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची जम्बो कार्यकारिणी !
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत शासनाकडून मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ हा गरीबांसाठी दिलासा ठरत होता. मात्र, यंदा तो पूर्णपणे बंद पडला. शिवाय नियमित मिळणारे रेशनही निकृष्ट दर्जाचे असल्याने जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
मेहकर तालुक्यात ५,१८७ अंत्योदय रेशन कार्डधारकांमार्फत २२,९७६ लाभार्थी, तसेच अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ४१,४१७ कार्डांद्वारे १.७० लाखांहून अधिक नागरिक या योजनांचा लाभ घेतात. इतक्या मोठ्या यंत्रणेअसतानाही नागरिकांच्या पदरी निकृष्ट तांदूळच का पडतो? असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.
Sanjay Gaikwad : निवडणूक आयाेगाचा मनमानी कारभार, कुणाचेही नियंत्रण नाही
या तांदळाबाबत विचारले असता काही रेशन दुकानदारांनी सांगितले की, “आम्हाला मिळणारा माल द्वारपोच योजनेतून गोडाऊनवर येतो. त्याची गुणवत्ता आम्ही तपासू शकत नाही.” मात्र नागरिकांचा प्रश्न असा आहे की, गोडाऊन किपर, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन या सर्वांच्या देखरेखीअसतानाही असा निकृष्ट दर्जाचा माल जनतेपर्यंत कसा पोहोचतो?








